हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त ट्वीट करून कंगना रनौत कायम चर्चेत राहिली आहे. तिच्या याच वादग्रस्त ट्विट्समुळे अखेर तिचे ट्वीटर अकाउंट ट्विटरने कायमस्वरूपी सस्पेंड केले आहे. पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर कंगनाचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. कंगना ने ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात असंसदीय शब्दांचा वापर केला होता.
#KanganaRanaut
Virus Vaccine pic.twitter.com/vycJzNOSB3— लपेटू बाबा Parody (@Sanzu_is_Back) May 4, 2021
तर हिंसाचारास प्रोत्साहनपर उद्गार देखील काढले होते. त्यानंतर कंगनाला मोठ्या प्रमाणात टीका आणि लोकांच्या रागास सामोरे जावे लागले होते.
Finally, Kangana's account suspended by Twitter
She was not just inciting violence but also praising and encouraging a genocide.
— Dhruv Rathee 🇮🇳 (@dhruv_rathee) May 4, 2021
आता अकाउंट सस्पेंड झाल्यावरही तिची यातून काही सुटका झालेली नाही. आता लोक तिच्यावर मीम्स तयार करून मजा घेत आहेत.
Everyone to Twitter now.#KanganaRanaut pic.twitter.com/lGqN8CQ3fK
— Nautankibaaj (@PAPA__Tweets) May 4, 2021
भाजप पक्षाशी कट्टर असणाऱ्या कंगनाने भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसचे लोक हिंसा करीत असल्याचा दावा केला होता. कोणत्याही तत्वाशी संबंधित नसलेले उद्गार तिने या ट्विटमध्ये प्रकट केले होते. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २००० साली घेतलेले विराट रुप धारण करुन ममतांना आटोक्यात आणण्याचा आग्रह करत होती.
#KanganaRanaut reaction after her twitter account banned👇👇 pic.twitter.com/wJCswvN35L
— लपेटू बाबा Parody (@Sanzu_is_Back) May 4, 2021
हे काय कमीच होते तर ढसाढसा रडत तिने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देखील विनंती होती. यामूळे तिला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. कुणी तिला वेडी, पागल, मूर्ख अश्या शब्दांनी संबोधत होते. तर कुणी तिच्या ट्विटर अकाउंटला निलंबित करण्याची मागणी करीत होते.
#KanganaRanaut must have got this feeling in her nightmare. 😹😹
pic.twitter.com/p2C50riQEp— Press Trust Of India (@ParodyPTI) May 4, 2021
तिच्या या विचित्र ट्विट्सनंतर मात्र तिचा मोठा कार्यक्रम झाला. तिचे ट्विटर अकांउट कायमस्वरूपी सस्पेंड करण्यात आले आहे. कंगनाचे अकाउंट ब्लॉक करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर मात्र उत्सव चालू आहे. लोकांनी मीम्सचा अक्षरशः धुवाँधार पाऊस पाडला आहे.
#KanganaRanaut Suspended ! pic.twitter.com/IneLLwp089
— Baba MaChuvera ( आत्मनिर्भर ANI सिस्टम ) ↗️ (@indian_armada) May 4, 2021
अनेक ट्विटर अकाउंटवरुन व्हिडीओ, गाणी आणि फोटो ट्वीट करण्यात आले आहेत. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या पेरोडी अकाउंटवरून संजय राऊत यांचा पेटी वाजवल्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. अश्याप्रकारे लोक कंगनाची खिल्ली उडवताना दिसत आहेत.