Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

खळबळजनक! अभिनेत्री तुनिषानंतर प्रसिद्ध युट्युबरने घेतला राहत्या घरी गळफास

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 28, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
1.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन विश्वातून एका मागे एक धक्का देणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणाची एकीकडे चर्चा सुरु असताना आता आणखी एक दुःखद घटना घडल्याचे समोर आले आहे. एकीकडे २० वर्षीय तुनिषा शर्माने शूटिंग सेटवर गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे. अशातच छत्तीसगडच्या रायगड येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय सोशल मीडिया स्टार युट्युबर लीना नागवंशीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

View this post on Instagram

A post shared by 💞𝙻𝙴𝙴𝙽𝙰 𝙽𝙰𝙶𝚆𝙰𝙽𝚂𝙷𝙸💞 (@leena_nagwanshi)

या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उठली आहे. एकीकडे तुनिषा आणि आता लीना..? हे सगळं काय चाललं आहे..? असे प्रश्न उठविले जात आहेत. लीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती आणि तिचे फॉलोवर्सही खूप आहेत. अगदी काहीच तासांपूर्वी तिने शेअर केलेल्या पोस्टवरून ती आत्महत्या करेल किंवा करण्याचा विचारसुद्धा करेल याचा अंदाज लावणे फारच कठीण आहे.

View this post on Instagram

A post shared by 💞𝙻𝙴𝙴𝙽𝙰 𝙽𝙰𝙶𝚆𝙰𝙽𝚂𝙷𝙸💞 (@leena_nagwanshi)

प्राथमिक माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी लीना दुपारी बाजारात गेली होती. बाजारातून घरी परतल्यावर लीना रुममध्ये नसल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं आणि ती लीनाला पाहण्यासाठी घराच्या गच्चीवर गेली. यावेळी दरवाजा बाहेरुन बंद दिसला.

View this post on Instagram

A post shared by 💞𝙻𝙴𝙴𝙽𝙰 𝙽𝙰𝙶𝚆𝙰𝙽𝚂𝙷𝙸💞 (@leena_nagwanshi)

आईने लीनाला बराच वेळ बाहेरून आवाज दिला पण तिने दरवाजा उघडला नाही. शेवटी कुटुंबियांनी गच्चीचा दरवाजा तोडला आणि तेव्हा गच्चीवरील एका पाईपला लीनाचा देह फासावर लटकलेला दिसला. लीनाच्या आत्महत्येची माहिती मिळताच चक्रधर नगर पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु झाला. यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. युट्युबर आणि इंस्टाग्राम इन्फ्लूएंसर लीना नागवंशीच्या चाहत्यांची संख्या बऱ्यापैकी चांगली आहे. यामुळे तिने शेअर केलेल्या पोस्ट व्हायरल होत असत.

View this post on Instagram

A post shared by 💞𝙻𝙴𝙴𝙽𝙰 𝙽𝙰𝙶𝚆𝙰𝙽𝚂𝙷𝙸💞 (@leena_nagwanshi)

मृत्यूच्या दोन दिवस आधी तिने ख्रिसमस थीमवर व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती आनंदी दिसत होती. पण मग आता अचानक आत्महत्या करण्यामागे कारण काय..? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

Tags: Commits Suicidedeath newsInstagram PostYoutuber
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group