Take a fresh look at your lifestyle.

ठरलं हो ठरलं; विकी- कॅटनंतर आता रणबीर- आलियाच्या लग्नाची सनई वाजणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी काहीच दिवसांपूर्व बी टाऊनचे बहुचर्चित कपलं अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह सोहळा जैसलमेरमध्ये अगदी धुमधडाक्यात पार पडला. हा शाही विवाह सोहळा सोशल मीडियापासून सर्वत्र चर्चेत होता आणि चांगलाच गाजला. यानंतर आता बॉलिवूडचं आणखी एक बहुचर्चित उच्च कुटुंबातील कपलं रणबीर कपूर आणि आलिया भट लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. मात्र आता यांबद्दलची अचूक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

जगभरातील कोरोनाचे संकट अनेकांच्या लग्नाची बाधा झाले होते. यानंतर एका मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला होता कि, कोरोनाचं हे महाभयंकर संकट जर आलं नसतं तर, केव्हाच आम्ही आमचं लग्न उरकलं असतं. दरम्यानच्या या काळात खूप काही होऊन गेलं. यानंतर अखेर आता लग्नाचा धुमधडाका सुरु झाला आहे आणि त्यामुळे रणबीर आलियाच्या लग्नाची सनईदेखील लवकरच वाजणार आहे. आता ही जोडी अखेर पुढच्या टप्प्यावर पोहोचली असून त्यांनी अधिकृतपणे कपूर आणि भट्ट कुटुंब अर्थात आलिया आणि रणबीर एकत्र येणार असल्याचे सांगत लग्नाच्या तयारीला लागले असल्याचं सांगितले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आणि प्रशासनाच्या निर्बंधांमुळे रणबीर आणि आलियाला बराच वेळ वाट बघावी लागली. दोघांच्या लग्नाचा मुहूर्त बऱ्यापैकी सतत पुढे ढकलला होता. यानंतर आता आणखी एक वर्ष पुढे हे लग्न ढककल्याची माहिती मिळतेय. येत्या वारसाहत २०२२ डिसेंबर वा २०२३च्या जानेवारी महिन्यात त्यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे अशी माहिती देण्यात येतेय.

मुख्य म्हणजे त्यांचं लग्न साधं सुध नाही तर दिमाखदार सोहळा असेल. पण ते डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आलियाशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार ते दोघे मुंबईतच लग्न करतील आणि हे लग्न ताज लँड्स येथे होईल अशी खास माहिती आहे.