Take a fresh look at your lifestyle.

‘मी वसंतराव’ पाहिल्यानंतर रघुनाथ माशेलकर म्हणाले, ‘राहुलमध्ये वसंतराव आहेत..’

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। निपुण धर्माधिकारी यांचा संगीतमय चित्रपट ‘मी वसंतराव’ अलीकडेच प्रदर्शित झाला. यानंतर अद्याप चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांची शाबासकी मिळवली आहे. ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा व्यक्त करणारा ‘मी वसंतराव’ हा दिग्गजांनाही चांगलाच आवडला आहे. यामध्ये पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचाही समावेश आहे. हा चित्रपट पाहून रघुनाथ माशेलकर भारावून गेले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भावुक होत सांगितले कि राहुलमध्ये वसंतराव आहेत हे आज समजले. या चित्रपटातील पंडित वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांचा नातू गायक राहुल देशपांडे यांनी साकारली आहे.

पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ‘मी वसंतराव’ हा चित्रपट पाहिला. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि, “माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं आहे.” असे म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व. अशा या दिग्गज, हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाचा प्रवास ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आला. राहुलमध्ये वसंतराव आहेत हे आज मला या चित्रपटातून जाणवलं. हा चित्रपट पाहताना प्रत्येक टप्प्यावर नवीन पैलू उलगडत जातात. चित्रपटाची निर्मिती, मांडणी इतकी सुंदर आहे की, चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यात चक्क पाणी होतं. ‘मी वसंतराव’ने मला पुढील वीस वर्षांसाठी काम करण्याची ऊर्जा दिली आहे.’

‘मी वसंतराव’ हा संगीतमय चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच आहे. हा सिनेमा निपुण अविनाश धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटातील व्यक्तिरेखा शोभून दिसेल अशा कलाकारांनी साकारल्या आहेत. यामध्ये महत्वाची आणि मुख्य भूमिका वसंतराव देशपांडे यांची आहे. जी त्यांचा नातू अर्थात गायक राहुल देशपांडे यांनी उत्तमरीत्या साकारली आहे. तर वसंतरावांच्या आईच्या भूमिकेत अनिता दाते आहे आणि पु. ल. देशपांडेंच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर दिसतोय. तसेच अमेय वाघ दीनानाथ मंगेशकर यांच्या भूमिकेत आहे.