Take a fresh look at your lifestyle.

‘मी वसंतराव’ सुंदर.. सिनेमा! चित्रपट पाहून भारावलेल्या सिद्धार्थने लिहिली खास पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘मी वसंतराव’ हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांचा संघर्ष, परंपरा जपण्याचा ध्यास आणि संगीताचा वारसा याविषयी अधोरेखित मुद्द्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाचं सर्व स्तरावर कौतुक आहे. यामध्ये आता अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि इतर दिग्गज मंडळी यांचाही समावेश आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर भारावून गेलेल्या सिद्धार्थ जाधव याने एक खास पोस्ट लिहिली आहे. जी सध्या चर्चेत आहे.

 

 

त्याने हि पोस्ट लिहिताना म्हटलं आहे की, मी वसंतराव… सुंदर.. सिनेमा… संपूर्ण टिमचं मनापासून अभिनंदन.. @nipundharmadhikari भावा..तू कमाल होतास..आहेस ..आणि कायम कमालच राहशील.. सिनेमागृहात मैफिल सजवली तू…@rahuldeshpandeofficial तुझ्या आवाजाची दुनिया fan आहे ..आणि मी ही त्यातलाच एक.. पण या सिनेमातला तुझा अभिनय…निःशब्द करणारा आहे.. सहज आणि तितकाच सुंदर[email protected] भावा लयच batting केलीयस तू…जबरी… खुप प्रेम[email protected]_kelkar खुपच छान..क्या बात है अनिता[email protected] आणि तूझं काय कौतुक करू.. तू तुझ्या प्रत्येक कामात जीव टाकतोस.. आणि इथंही बहार आणलीयस तू..अभिनंदन @officialjiostudios @saneness_ sir आणि संपूर्ण “मी वसंतराव.. टिमचं…

 

 

‘मी वसंतराव’ हा संगीतमय चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच आहे. हा सिनेमा निपुण अविनाश धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा शोभेल अशा कलाकारांनी यात अभिनय केला आहे. यामध्ये महत्वाची आणि मुख्य भूमिका वसंतराव देशपांडे यांची आहे. जी त्यांचा नातू अर्थात गायक राहुल देशपांडे यांनी उत्तमरीत्या साकारली आहे. तर वसंतरावांच्या आईच्या भूमिकेत अनिता दाते आहे आणि पु. ल. देशपांडेंच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर दिसतोय. तसेच अमेय वाघ दीनानाथ मंगेशकर यांच्या भूमिकेत आहे.