Take a fresh look at your lifestyle.

‘हा चित्रपट पाहून अस्वस्थ व्हायला झाले’; ‘जय भीम’ चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड ट्विटरवर झाले व्यक्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरस्टार सुरिया याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जय भीम’ या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. एका सत्यघटनेवर हा चित्रपट आधारलेला असून नुकताच हा ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट म्हणजे एका अबोल विषयाला बोलता करणारा चित्रपट असून यातील प्रत्येक कलाकाराने आपले पात्र जीव ओतून साकारले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा चित्रपट पाहिला आणि यानंतर ‘जय भीम’ हा चित्रपट पाहून अस्वस्थ व्हायला झाले, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘जय भीम’ हा चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा चित्रपट पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर., असा एक प्रश्न पडला आहे. यासंदर्भात व्यक्त होताना जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले कि, मला आठवत नाही की मी माझ्या भाषणाच्या शेवटी जय भीम कधी म्हणायला लागलो. ही घोषणा एका जातीशी संबंधीत नसून ते एक ऊर्जास्रोत आहे. जे तुम्हांला अन्यायाविरुद्ध, स्वाभिमानासाठी, स्वत्वासाठी उभे राहायला मदत करते, ताकद देते. आजही आपण पूर्णपणे जातीभेदाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडलेलो नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर.., अश्या प्रकारे आव्हाड व्यक्त झाले आहेत.

दरम्यान, अनेक विविध भाषिक अभिनेत्यांनी देखील या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. जय भीम चित्रपटाने आयएमडीबी यादीत भारतीय चित्रपटांमध्ये सर्वात्कृष्ट मानांकन मिळवले आहे. हा चित्रपट १९९३ मधील कुडलोर या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ९.८ रेटिंग मिळालं आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांसह, कलाकार आणि क्रू टीमचं अभिनंदन. जय भीम हा खरोखरच एक उत्कृष्ट चित्रपट आहे. दाक्षिणात्य सिनेमांना अधिक ताकद मिळो, अशी प्रतिक्रिया राजदचे आमदार प्रल्हाद यादव यांनी दिली आहे.