Take a fresh look at your lifestyle.

विकी-कॅटच्या लग्नानंतरचा पहिला सण ठरला ख्रिसमस; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| याच वर्षातील सुरू महिन्याच्या ९ तारखेला राजस्थान मधील एका पॅलेस मध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ यांचा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. हा विवाह सोहळा अतिशय संरक्षणात आणि गौप्य भूमिकेत पार पडला. दरम्यान हा विवाहसोहळा अत्यंत चर्चेचा विषय झाला होता. यानंतर विकी आणि कॅट ने त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते जे प्रचंड वायरल झाले होते. यानंतर आता लग्नानंतरचा पहिला सण ख्रिसमस या दोघांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. याचे फोटो वायरल होत आहेत.

लग्नानंतर अगदी काहीच दिवसात विकी आणि कॅट आपापल्या कामावर रुजू झाले. मात्र त्यांनी एकमेकांना वेळ देण्यासाठी लहान लहान गोष्टींचा आधार घेणे योग्य समजले आहे. जसे की लग्नानंतरचा पहिला सण आणि हा पहिला सण ठरला ख्रिसमस. यानिमित्ताने त्या दोघांनीही एकमेकांसाठी आवर्जून वेळ काढला आहे आणि यानंतर काही फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंवर त्यांचे चाहते देखील दोघांना ख्रिसमस आणि न्यू इयर च्या शुभेच्छा देत आहेत.

विकी कौशल ने आपल्या हक्काच्या गोड बायकोसोबत शेअर केलेला ख्रिसमस स्पेशल फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. अगदी १०-१२ तासांत या फोटोंवर ३५ लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक मिनिटाला एक कमेंट या कमेंट बॉक्स मध्ये पडताना दिसतेय. एकंदरच हे कपलं खूप गोड, सुंदर आणि ते म्हणतात ना मेड फॉर इचं अदर अस काहीस आहे अश्या प्रतिक्रिया या फोटोंवर येत आहेत.