Take a fresh look at your lifestyle.

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याने केली कोरोनावर मात; रुग्णालयातून भेटला डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऐश्वर्या राय बच्चन यांच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. कोरोनावर मात केल्यानंतर ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 14 जुलैला बातमी आली होती की ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह होती, त्यानंतर दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता दोघीही ठीक आहेत व जलसा येथील त्यांच्या घरी पोहोचत आहेत.

ऐश्वर्या राय आणि आराध्या यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याचे ट्विट करून अभिषेक बच्चन यांनी याबाबत माहिती दिली आहे. अभिषेकने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘तुमच्या सतत प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. मी नेहमीच तुमचा आभारी राहील ऐश्वर्या आणि आराध्या यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याच्या वृत्तानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता घरी आहेत. मी व माझे वडील अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहोत.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची तब्येतही सुधारत आहे आणि दोघांनाही सध्या नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे. ऐश्वर्या आणि आराध्या आता एकदम ठीक आहेत, बच्चन कुटुंबासाठी ही एक चांगली बातमी आहे, तसेच त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

Comments are closed.