Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीतील ED कार्यालयात ऐश्वर्या राय हजर; पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी सुरु

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडस्ट्रीतील नामांकित कुटुंब म्हणून बच्चन कुटुंबाकडे पाहिलं जात. यानंतर त्यांच्या नावाला ठप्पा लागतो का काय? अशी काहीशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्याचे कारण म्हणजे बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन हिचे नाव पनामा पेपर्स प्रकरणात समोर आले आहे. दरम्यान EDकडून तिला आज दुसरे समन्स बजावल्यानंतर ती दिल्लीतील ED कार्यालयात हजर झाली आहे. यापूर्वी दोन वेळा ऐश्वर्याला चौकशीसाठी बोलवले होते. पण दोन्ही वेळा ऐश्वर्याने ED समोर हजर राहणे टाळले. या केसमध्ये आतापर्यंत ५०० भारतीयांची नावे समोर आली आहेत. यात अगदी राजकारण्यांपासून कलाकार, खेळाडू व बड्या उद्योगपतींचाही समावेश आहे. या प्रत्येकावर मनी लॉड्रिंगचा आरोप आहे.

पनामा पेपर्स प्रकरण हे काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजलं होतं. याचा बऱ्याच दिवसांपासून तपास सुरू आहे. माहितीनुसार २०१६ मध्ये, यूकेमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे ११.५ कोटी कर दस्तऐवज लीक झाले होते. यामध्ये जगभरातील मोठे नेते, उद्योगपती आणि इतर मोठमोठ्या नामांकित व्यक्तींची नावे समोर आली होती. यात जवळपास ३०० भारतीयांची नावं समोर आली होती. त्यात बच्चन कुटुंबाचाही समावेश आहे. लीक झालेले दस्तऐवज प्रथम एका जर्मन वृत्तपत्राने मिळवले होते. अशी सुमारे १२००० कागदपत्रे गहाळ आहेत ज्यांचा भारतीयांशी संबंधित आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, यात अमिताभ बच्चन यांना ४ कंपन्यांचे संचालक बनविले होते. यापैकी ३ बहामामध्ये, १ व्हर्जिन आयलंडमध्ये आहे. साल १९९३ मध्ये या कंपन्या तयार केल्या होत्या. यासाठी भांडवल ५ हजार ते ५० हजार डॉलर्स इतके होते. यानंतर २००५ साली बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्याला एका कंपनीचं संचालक बनवलं. या कंपनीचं नाव अमिक पार्टनर्स प्राय. लिमिटेड होतं. या कंपनीचे मुख्यालय व्हर्जिन आयलंडध्ये होते. दरम्यान ऐश्वर्या कंपनीची शेअर होल्डर बनली. यात वडील, आई आणि भाऊदेखील भागीदार होते. ही कंपनी २००५ साली स्थापन होऊन ३ वर्षांनी २००८ मध्ये बंद पडली. यानंतर आज ती चौकशीसाठी हजार राहिली असून आता अमिताभ बच्चन यांनाही ईडी समन्स बजावण्याची शक्यता आहे.