Take a fresh look at your lifestyle.

महिंद्रा ग्रुपच्या कमर्शिअल ऍड शूटदरम्यान सिंघम वैतागला; नेमकं झालं तरी काय? जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महिंद्रा ग्रुप एक मोठा व्यावसायिक ग्रुप असल्यामुळे चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काही ना काही करताना दिसत असतात. मग अनेकदा यासाठी काही जाहिराती किंवा मग काहीतरी स्टंट केले जातात. अशीच एक कमर्शिअल ऍड करताना बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगन चांगलाच संतापल्याचे दिसून आले आहे. हा एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये अजय देवगन महिंद्राच्या जाहिरात शूटदरम्यान संतापतो असे दिसत आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाल्यानंतर अखेर तो पब्लिसिटी स्टंट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ट्विटरवर खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन हा विविध जाहिरातींचे शूट करीत असतो. शेवटी तो एक आयकॉन स्टार आहे. पण महिंद्राच्या जाहिरात शूटदरम्यान तो संतापल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला आहे. यात वारंवार स्क्रिप्ट बदलल्याने ब्रॅण्ड एम्बेसिडर असणारा अजय चिडतो असं एकंदर दिसत आहे. तो या व्हिडीओत बोलताना दिसतोय कि, वारंवार स्क्रिप्ट का बदलत आहात? यावर कॅमेऱ्यामागे असलेली व्यक्ती फक्त चार वेळा बदलली आहे असं उत्तर देते. यानंतर अजय निरुत्तर झाल्यासारखा पाहत राहतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्वीट करीत लिहिले कि, “मला अजय देवगन महिंद्राच्या शूटदरम्यान संतापल्याचं सांगण्यात आलं आहे. आमच्या एखाद्या ट्रकमधून तो माझ्या मागे येण्याआधी मी शहर सोडलेलं बरं”. या ट्विटनंतर हे समोर आले आहे कि, महिंद्रा ग्रुपचा हा एक पब्लिसिटी स्टंट होता आणि यामध्ये आनंद महिंद्रादेखील सामिल होते. हा एक ठरवून करण्यात आलेला व्हिडीओ होता. या व्हिडीओच्या शेवटी पाहत रहा असं सांगण्यात आलं आहे. आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत नेटकरी म्हणाले कि, जाहिरात करण्याची ही चांगली पद्दत आहे. तर अन्य एकाने लिहिले कि, अजय देवगन दोन ट्रकमध्ये येईल, तुम्हाला त्याच्या स्टंट्सची कल्पना नाही.

या एव्हढ्या सगळ्यानंतर अखेर आनंद महिंद्रा यांनी हि जाहिरात पूर्ण पोस्ट केली आहे आणि त्यासोबत एक भारी कॅप्शन सुद्धा लिहिलं आहे. ठीक आहे. आता अखेर शेवटी संपले, असे मला वाटते… तर आता अजय देवगनपासून मी सुरक्षितत आहे आणि पळून जाणारी वाहने सोडून शहराकडे परत येऊ शकेन? हो ना? आता सगळं स्पष्ट आहे? आनंद महिंद्रा यांच्या नव्या चारचाकीची हि जाहिरात असून आतापर्यंत या जाहिरात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.