Take a fresh look at your lifestyle.

अजय देवगणचे 41 दिवसीय कठोर व्रत पूर्ण: कपाळी टिळा, गळ्यात रुद्राक्ष माळा; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा एक भारी लूक सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. अनेकांनी हा नवा लूक नवीन चित्रपटाची नांदी असेल असे म्हटले होते. कारण या लूकमध्ये कपाळावर टिळक आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेला अजय अनोख्या अवतारात दिसतो आहे. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी हा आगळा वेगळा अवतार नक्कीच ‘शिवाय २’ मधला असेल असे मनाशीच ठरवले होते. खरतर अशी चर्चाच सुरु होती. पण आता अजयच्या या लूकमागचे कारण समोर आले आहे. त्याने बुधवारी केरळच्या सबरीमाला येथील भगवान अयप्पा स्वामी मंदिराचे दर्शन घेऊन प्रार्थना करीत आपले व्रत पूर्ण केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

आजच्या जगात व्रत वैकल्य यापुढे लोक गेले असले तरीही श्रद्धेची काही कमी नाही हे या अभिनेत्याने दाखवून दिले आहे. अभिनेता अजय देवगणने सबरीमाला मंदिराचे दर्शन घेण्यापूर्वी महिनाभर मंदिराचे विधी आणि नियमांचे पालन केले होते. संपूर्ण काळ्या पोशाखात, डोक्यावर अरुमुदी केत्तु घेऊन इतर भाविकांसह तो पायी मंदिरात पोहोचला आणि देवाचे दर्शन घेत पूजा केली आहे. यानंतर देवस्थानच्या मंडळ अधिकाऱ्यांनी अजयला शाल भेट म्हणून दिली. मंदिराच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सबरीमालाची तीर्थयात्रा ही इंद्रियांची परीक्षा असल्याचे सांगितले आहे. यात्रेच्या यशस्वी पूर्ततेसाठी यात्रेकरूंनी ‘वृत्तम’ म्हणून ओळखले जाणारे साधे धार्मिक जीवन जगणे यानुसार अपेक्षित आहे.

ETimes च्या रिपोर्टनुसार, अजयने गेल्या ४१ दिवसांपासून कठीण साधना करीत संपूर्ण व्रत मोठ्या भक्ती भावाने केले आहे. अजय देवगणने स्वामी अयप्पाच्या दर्शनासाठी पूर्ण ४१ दिवस उपवासही केले होते. या व्रतामध्ये ४१ दिवसांचे ब्रह्मचर्य जीवन जगावे लागते हा नियम असून यात जमिनीवर झोपावे लागते. शिवाय नखे कापू नयेत. काळे वा पांढरे वस्त्र परिधान करावे लागते. केवळ एकवेळ शुद्ध अन्न खावे लागते. याशिवाय खोटेपणा आणि क्रोधापासून दूर रहावे आणि संन्यासीसारखे जीवन जगावे लागते. अजयने ४१ दिवस सर्व विधी पाळले आणि अखेर त्याचे व्रत पूर्ण झालेच.

 

दरम्यान, सबरीमाला मंदिर वर्षभरात केवळ नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत भाविकांसाठी खुले असते. उर्वरित महिने हे मंदिर पूर्णपणे बंद ठेवले जाते. आता हे मंदिर २९ डिसेंबरला उघडले असून ते १४ जानेवारीपर्यंत अर्थात केवळ आजपर्यंत खुले राहणार आहे. त्यामुळे ४१ दिवस हे विधी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस स्वामींचे दर्शन घेण्याची संधी आणि भाग्य प्राप्त होते. हा उपवास करणार्‍या व्यक्तीने प्रथम पंपा त्रिवेणीमध्ये स्नान करायचे असते आणि त्यानंतर दिवा लावून नदीत प्रवाहित करून सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जायचे असते.