Take a fresh look at your lifestyle.

‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ या सीरिजच्या माध्यमातून अजय देवगण करणार ओटीटीवर डेब्यू

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रुपेरी पडद्यावर राज्य केल्यानंतर आता अभिनेता अजय देवगण ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर ‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ हि एक क्राईम ड्रामा सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगण या सीरीजमधून एका दर्जेदार भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतील बर्‍याच आयकॉनिक लोकेशन्सवर या सीरीजची शूटिंग होणार आहे. यात अजय देवगण प्रखर पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस ही एक वेगळी कॉप स्टोरी आहे. ज्याचे कथानक इतरांपेक्षा हटके आणि खूप वेगळे असेल. यातून अजय ‘रुद्र’च्या अवतारात मोठा धमाका करणार आहे. या थ्रिलर आणि क्राईम सिरीजमध्ये अजयला पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. ही नवी वेब सीरीज लोकप्रिय ब्रिटीश मालिका ‘लूथर’वरून प्रेरित आहे. या सीरीजमध्ये अजयसमवेत अभिनेत्री इलियाना डिक्रूझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

या सिरीजमधील भूमिकेबाबत अजय म्हणतोय, ‘प्रेक्षकांना वेगळी कथा दाखवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. या माध्यमातून आम्हाला भारतीय प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन करायचे आहे. डिजिटलचे जग मला खूप आकर्षित करत होते आणि मी या सीरीजमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. तसेच, पडद्यावर पोलिसांची भूमिका निभवायची असे मला सांगितले नाही, परंतु या वेळी हे पात्र थोडे तीव्र, गुंतागुंतीचे आणि अधिक गडद असेल. मला याबद्दल सर्वात विशेष वाटले ते म्हणजे ‘रुद्र’ आतापर्यंतचे सर्वात भिन्न ग्रे-शेड पात्र असेल.’