Take a fresh look at your lifestyle.

‘आदिपुरुष’ मध्ये होणार अजय देवगणची एन्ट्री ?? ‘ही’ भूमिका साकारण्याची शक्यता

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. प्रभास या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने या सिनेमात लंकेश सैफ अली असणार असल्याचं जाहीर केलं. हा चित्रपट रामायणावर आधारलेला असणार आहे. यात प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे. आधी प्रभास नंतर सैफ अली खान यांच्या भूमिकांची घोषणा झाल्यावर प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशात आता या सिनेमासोबत अभिनेता अजय देवगनचं नावही जोडलं जात आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘आदिपुरूष’ च्या मेकर्सनी आधीच या सिनेमात सैफ अली खान लंकेशची म्हणजेच रावणाची भूमिका साकारणार अशी घोषणा केली आहे. तर प्रभास हा रामाची भूमिका साकारणार आहे. अशात आता अभिनेता या सिनेमात भगवान शिवाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण याबाबत मेकर्सकडून काहीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सध्या ‘आदिपुरूष’ चं प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. सिनेमाचं शूटींग २०२१ मध्ये सुरू होईल . महत्वाची बाब म्हणजे हा सिनेमा हिंदी, तेलुगूसहीत इतरही वेगवेगळ्या भाषांमध्ये शूट केला जाणार आहे. तर तमिळ, मल्याळम आणि कन्नडासहीत इतर आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये डब केला जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.