Take a fresh look at your lifestyle.

आला रे आला संत्या आला; ‘समरेणू’तील खलनायकाच्या पोस्टरचे अजित दादांच्या हस्ते अनावरण 

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशी हटके टॅगलाईन असलेला आगामी मराठमोळा चित्रपट ‘समरेणू येत्या १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ‘समरेणू’च्या पोस्टरचे अनावरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर आता चित्रपटातील संत्या या व्यक्तिरेखेचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या पोस्टरमधील व्यक्तिरेखा संत्या हा चित्रपटातील खलनायक आहे.

महेश डोंगरे दिग्दर्शित ‘समरेणू’ या चित्रपटात महेश डोंगरे, रुचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ‘समरेणू’ चित्रपटातील खलनायक संत्या आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संत्या ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता भरत लिमण उपस्थित होता. तो स्वतः प्रत्यक्षात एक पैलवान आहे.

‘समरेणू’बद्दल प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले कि, ” महेश डोंगरे यांचा दिग्दर्शक, अभिनेता म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे त्यांच्या पदार्पणासाठी त्यांना शुभेच्छा तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा. एक वेगळा विषय असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल, ”

दरम्यान आपल्या चित्रपटाविषयी आणि पोस्टर अनावरणानंतर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणाले कि, “आज महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांच्या हस्ते ‘संत्या’च्या पोस्टरचे अनावरण झाले आहे. संत्याची या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे. आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणान्य ‘समरेणू’ची टॅगलाईनच ‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय’ अशी आहे त्यामुळे या चित्रपटाचा शेवट पाहणे, खूप औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रेक्षकांनी सम्या आणि रेणूच्या प्रेमकहाणीचा शेवट काय होतो, हे जाणून घेण्यासाठी ‘समरेणू नक्की पाहावा.”