आर्चीच्या फोटोवर परश्याची कमेंट; नेटकरी म्हणाले ‘भाई घे जमवून.. जोड मस्त आहे’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री रिंकू राजगुरू हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे अनेकदा ती स्वतःचे विविध पेहरावातील फोटो शेअर करते. तिचा चाहता वर्गही फार मोठा असल्यामुळे तिने शेअर केलेल्या पोस्टला चांगले व्ह्यूज आणि लाईक्स मिळतात. इतकेच नव्हे तर तिचे चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना विविध कमेंट्सदेखील करतात. सैराटमध्ये रिंकू सोबत मुख्य भूमिकेत असलेला आकाश ठोसर हा तर चाहत्यांचा आवडता विषय आहे. कारण या चित्रपटापासून रिंकू आणि आकाशचं सूत जुळावं म्हणून अनेक चाहते अगदी देवाला प्रार्थना करताना दिसले आहेत. यांपैकी काही आता खोड्या काढण्यात व्यस्त आहेत.
नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ख़ूबसूरती न सूरत में है न लिबास में, निगाहें जिसे चाहे उसे हसीन कर दें।’. हे फोटो पाहून अगदी कुणीही तिच्या प्रेमात पडेल यात काहीच वाद नाही. पण सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचे जितके फॅन आहेत तितकेच आर्ची आणि परश्याचेसुद्धा फॅन आहेत. त्यात या फोटोवर आकाश ठोसरने म्हणजेच नेटकऱ्यांच्या लाडक्या परश्याने एक फायर सिम्बॉल कमेंट केला आहे. आता नेटकऱ्यांमध्येपण लव्हगुरूची काही कमी नाही. त्यामुळे किमान एक सल्ला देना तोह बनता है ना..! असेच काहीसे यावेळी झाले आहे. रिंकूच्या या मस्त मौलाना अंदाजावर अनेकांनी एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत. पण यामधील काही कमेंट्स अगदी लक्षवेधी आहेत.
एका नेटकऱ्याने या फोटोवर कमेंट करताना पुष्पा चित्रपटाच्या डायलॉगचा आशय घेतला आहे. त्याने लिहिलंय कि, ‘रिंकू नाम सून के बच्चा समझे क्या..? बडी हो गई मै’. तर आणखी एका नेटकऱ्याने थेट परश्याला म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरला ‘फिदा आहेस ना तिच्यावर..?’ असा सवाल केलाय. आणखी एकाने थेट जमवून टाक असा सल्लाच दिलाय. त्याने कमेंटमध्ये लिहिलंय कि, भाई घे जमवून. जोड मस्त आहे तुमचा’. याशिवाय अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेदेखील रिंकूच्या फोटोवर कमेंट केली आहे.