Take a fresh look at your lifestyle.

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘बच्चन पांडे’ येणार; कल्ला पहायला व्हा तयार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय असा कॉमेडी शो म्हणून चला हवा येऊ द्या ओळखला जातो. गेली कित्येक वर्षे या कार्यक्रमाच्या माध्यमातून कल्लाबाज कलाकार प्रेक्षकांना बोट न लावता खळखळून हसवत आहेत. दरम्यान हे कलाकार प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमावर लोक प्रेम करत आहेत. या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहता मराठी सिनेमांप्रमाणे आता बॉलिवूड सिनेमांचे प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणात यात केले जाते. अशातच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सनॉन यांचा बच्चन पांडे लवकरच येत आहे. याच्या प्रमोशनसाठी त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी लावली आहे.

अक्षय आणि क्रिती हे त्यांच्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आले होते. यावेळी अक्षय कुमारचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पहायला आणि जवळून अनुभवायला मिळाला. येत्या आठवड्यात प्रेक्षकांना ‘बच्चन पांडे’चा विशेष भाग पहायला मिळणार आहे. दरम्यान अक्षय कुमार येणार म्हणून सर्वांचा उत्साह तुफान वाढला आहे. अक्षय कुमार आणि क्रिती सॅनॉन यांनी ‘चला हवा येउ द्या’च्या मंचावर डान्ससुद्धा केला आहे. त्यांचा परफॉर्मन्स पाहून नुसत्या टाळ्या आणि शिट्या चालूच राहिल्या होत्या.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा एक पूर्ण पॅकेज आहे. मजा मस्ती, ऍक्शन, कॉमेडी सगळं काही तो करतोच. पण तो खऱ्या आयुष्यात किती कल्ला करतो हे चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून सगळ्यांना पाहायला मिळेल. त्यात अक्षय आणि क्रिती येणार म्हणून आपल्या लाडक्या विनोदवीरांनी नुसता धुमाकूळ घालून पोट धरून हसवलं आहे.

दरम्यान अक्षय आणि क्रितीने देखील या विनोदवीरांसोबत मिळून धमाल केली आहे. ही सर्व धमाल मस्ती नुभवायची असेल तर पुढच्या आठवड्यात सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनीवर चला हवा येऊ द्या चा विशेष भाग जरूर पहा.