Take a fresh look at your lifestyle.

अक्षय कुमारने घोषित केला ‘दुर्गावती’; शीर्षक भूमिकेत ‘भूमी पेडणेकर’

0

मुंबई | सुपरस्टार अक्षय कुमार याने ‘दुर्गामती’ हा नवीन सिनेमा घोषित केला आहे. या स्त्रीप्रधान चित्रपटात भूमि पेडणेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. जानेवारीच्या मध्यात या चित्रपटाची शूटिंग सुरु होईल. अक्षय कुमार आणि टी-सिरीजचे भूषण कुमार या साठी एकत्र आले आहेत. या चित्रपटात आर. माधवन प्रमुख भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारने या प्रोजेक्टसाठी उत्सुक असल्याची इंस्टा पोस्ट शेअर केली आहे. हा भय-थरारपट ‘भागामथी’ या तेलुगू सिनेमाचा रिमेक असणार आहे. भागामथी चित्रपटामध्ये अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. याच्या हिंदी रिमेकसाठी निर्माते म्हणून विक्रम मल्होत्रा त्यांच्या ‘अबुदांतीया’ या प्रोडक्शन हाऊसद्वारे काम पाहणार आहेत. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक जी. अशोक च या रिमेकच दिग्दर्शन करणार आहेत.

‘भागामती’ चित्रपटाचे पोस्टर. भूमी दिसेल या अवतारात !

Leave a Reply

%d bloggers like this: