Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ऊ अंटवा! साऊथच्या समंथासोबत बॉलिवूडचा खिलाडी थिरकला; सिझलिंग मूव्ह्सने तापवलं वातावरण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 20, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Samantha_Akshay
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथच्या अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट प्रचंड गाजला. पण त्याहूनही जास्त गाजली ती यातली गाणी. या चित्रपटात एक आयटम सॉंग आहे. या एकाच गाण्यापुरता दाक्षिणात्य अभिनेत्री आणि द फॅमिली मॅन वेब सिरीज फेम समंथा रूथ प्रभू या चित्रपटात दिसली. हे तीच पहिलं वहिलं आयटम सॉंग असून या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली. या गाण्यावर कित्येक रिल्ससुद्धा व्हायरल झाले. अशा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गाण्यावर नाचण्याचा मोह मग कुणालाही कसा काय आवरेल..? असच झालं बॉलिवूडच्या खिलाडीसोबत आणि अखेर ज्या मंचावर तो समंथाला भेटला त्याने लगेच या गाण्यावर तिच्यासोबत ताल धरला. साधय हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

हा व्हायरल होणारा व्हिडीओ ‘कॉफी विथ करण’च्या नव्या कोऱ्या सिजनच्या सेटवरील आहे. या व्हिडिओमध्ये आपण समंथा आणि अक्षय यांना एकत्र पाहू शकतो. या आठवड्यातील भागात समंथा आणि अक्षयसोबत करणचा प्रश्न उत्तरांचा खेळ रंगणार आहे. दरम्यान अक्षय समंथासोबत लोकप्रिय गाणं ऊ अंटवावर थिरकताना दिसणार आहे. त्याची हि झलक तुम्ही पाहू शकता. समंथा आणि अक्षयचा हा सिझलिंग डान्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. मुख्य म्हणजे ते दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, सध्या अक्षय कुमारकडे बरेच चित्रपट आहेत. यापैकी एक म्हणजे आनंद एल राय यांचा रक्षाबंधन. यातील एक नवे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. शिवाय आनंद यांचाच ओह माय गॉड देखील प्रदर्शनाच्या तयारीत आहे. तसेच अभिषेक शर्मा दिग्दर्शित रामसेतू हा चित्रपट देखील लवकरच येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

तसेच अभिनेत्री समंथा रूथ प्रभूचे २ चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. एक म्हणजे ख़ुशी. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. तर दुसरा यशोदा. या चित्रपटाचे कथानक प्रचंड वेगळे आणि आव्हानात्मक असणार आहे.

Tags: akshay kumarcoffee with karanOo Antava SongSamantha PrabhuViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group