Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडचा खिलाडी पडला ‘पुणेरी मिसळ’च्या प्रेमात; मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाला, खूप छान!

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रातील पुणे हे अस्सल आणि चविष्ट मिसळीसाठी भयंकर प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्यात गेलो आणि मिसळ खाल्ली नाही तर काय मजा…? पुणेकर कधीही आणि कुठेही आमची मिसळ जगात भारी अभिमानाने सांगतो त्याच कारणंच हे आहे. हि मिसळ खाण्याचा मोह आवरणे फार मुश्किल. अशीच परिस्थिती बॉलिवूडच्या खिलाडीची अर्थात अभिनेता अक्षय कुमारचीही झाली. त्यालाही फिटनेसप्रेम सोडून मिसळ खाण्याचा मोह झाला आणि त्याने मिसळ चाखली सुद्धा. दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

 

 

आगामी चित्रपट रक्षाबंधन’च्या प्रमोशनसाठी अक्षय पुण्यात आला होता. दरम्यान भुकेला पर्याय काय..? शोधताना कुणीतरी मिसळ खाण्याचा सल्ला दिला. मग काय बॉलिवूडचा खिलाडी थेट मिसळ पाव खाण्यासाठी पोचला. त्याने मिसळ खाण्याचा अगदी मनसोक्त आस्वाद घेतला. रिपोर्टनुसार, त्याचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे आणि म्हणूनच चालू प्रमोशनमध्ये अक्षय कुमार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वाट्टेल त्या भन्नाट गोष्टी करताना दिसतोय. सध्या इंटरनेटवर त्याचा मिसळ पाव खाण्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकांना फिटनेस फ्रिक अक्षय कुमार मिसळ पाव खातोय हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण काय करणार.? पापी पेट का सवाल है..?

अक्षयने या मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर एक शॉर्ट नोटदेखील सोशल मीडियावर लिहिली आहे. सोबत आपल्या चित्रपटातील बहिणींसोबत एक फोटोही शेअर केला आहे. यात त्याने लिहिलं आहे कि, प्रत्येक पुणेकराची जान आणि शान, मिसळ पाव! आमच्या हृदयानंतर आता आमचं पोटही पूर्णपणे भरून गेलं आहे. धन्यवाद श्रीमंत मिसळ आणि बरेच काही.. खूप छान! पुणेरी मिसळ म्हणजे स्वादिष्ट महाराष्ट्रीयन मेजवानी असे म्हणायला हरकत नाही. तसा अक्षय स्वादिष्ट आणि पारंपारिक पदार्थ खाण्याचा शोकीन आहे. पण तरीही त्याने तेल तवंग असलेली मिसळ खाणे हा दुर्मिळ क्षण आहे असे त्याचे चाहते बोलताना दिसत आहेत.