Take a fresh look at your lifestyle.

तुला भेटल्यावर बघून घेईन; कॉमेडी किंग कपिल शर्मावर बॉलिवूडचा खिलाडी वैतागला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही जगतातील प्रसिद्ध कॉमेडी किंग कपिल शर्मा आता पुन्हा एकदा आपल्या दमदार कामेद्य नाईट्सच्या नव्या इनिंगसोबत धमाकेदार एन्ट्री करत आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२१ दिवशी त्याच्या शोचा पहिला एपिसोड सोनी टीव्हीवर प्रक्षेपित केला जाईल. मुख्य म्हणजे या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या ‘बेल बॉटम’ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. मात्र तत्पूर्वी कपिलने केलेल्या विधानांमुळे मात्र अक्षय नाराज झाल्याचे ट्विटरवर दिसून आले. इतकचं नव्हे तर ट्वीट करत त्याने म्हटलं आहे कि, ‘भेटल्यावर मी तुला बघून घेईन’.

त्याच झालं असं कि, कपिलने ट्रेलरवर ट्वीट करत म्हटले कि, ‘खुप सुंदर ट्रेलर आहे अक्षय सर, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा’. यावर लगेच ट्वीट करत अक्षयने म्हटलं’ जेव्हा तुला समजलं की, मी शोमध्ये येणार आहे, लगेच शुभेच्छा दिल्यास, त्याआधी नाही. थांब तुला भेटून सांगतो’. त्यांच्या या मजामस्तीचा चाहते खुप आनंद घेताना दिसत आहेत इतकेच नव्हे तर यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्सदेखील केल्या आहेत. मुख्य बाब अशी कि, अक्षय कुमारने आत्तापर्यंत तब्बल २५ वेळा कपिलच्या शोवर उपस्थिती दर्शविली आहे.

मुळात हे ट्विट पाहून कुणालाही वाटेल कि अक्षय कुमार कपिलला चांगला धुवून काढणार आहे. पण, खरी बाब अशी कि हि हलकी फुलकी नाराजी आहे. अर्थात हा केवळ थट्टा मस्करीचा एक भाग होता. त्यामुळे नेटकाऱ्यानी देखील यात समावेश करीत अनेक कमेंट्स केल्याचे दिसत आहे. नुकताच ३ ऑगस्ट २०२१ला अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यामध्ये अक्षय एका गुप्तहेरच्या भूमिकेत दिसत आहे. या ट्रेलरनंतर चाहत्यांनी अक्षयच्या लूकचे खुप कौतुक केले आहे. तसेच चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकतादेखील दाखवली आहे.