Take a fresh look at your lifestyle.

‘इनटू द वाइल्ड विथ बीअर ग्रिल्स’: अक्षय कुमार करतोय खतरनाक स्टंट ; पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार लवकरच ‘इनटू द वाइल्ड विथ बीअर ग्रिल्स’ मध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर शोचे टीझर शेअर करताना याबद्दल माहिती दिली. आता याचा एक छोटा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. अक्षय कुमारने स्वतः एक व्हिडिओ आपल्या ट्विटररून शेअर केला आहे.

एका मिनिटाच्या या लहान व्हिडिओमध्ये अक्षय कुमार बायर ग्रिल्ससोबत साहस करायला गेला असल्याचे दाखवले आहे. 11 सप्टेंबर रोजी डिस्कवरी चॅनलवर प्रसारित होणाऱ्या ‘इनटू द वाइल्ड’ च्या विशेष भागात बरेच काही दर्शविले जाईल. याबद्दल स्पष्टीकरण देताना अक्षय कुमार लिहितो, ‘इनटू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ च्यापूर्वी मी कठोर आव्हानांची कल्पना केली होती, पण बेअर ग्रिल्सने ‘एलिफंट पोप चहा’ने मला आश्चर्यचकित केले. किती छान दिवस होता तो

व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकार कुठेतरी जंगलात फिरत आहेत.अक्षय कुमारसोबत बेयर ग्रिल्सही एका ट्रकच्या मागे लटकताना दिसून आला आणि चालत्या ट्रकमधूनच खाली उतरतात. त्यानंतर बेयर अक्षयला हत्ती पोप चहा प्यायला लावतो. परंतु, बेयर स्वतःच आपला चहा फेकून देतो. या घनदाट जंगलात अक्षय आणि बेयर अनेक अॅडव्हेंचर्स करताना दिसून आले. तसेच एक नदी रश्शीच्या मदतीने दोघेही पार करतात. त्या नदीत एक भयानक मगरी दिसून येत असतात. याचसोबत एका फ्लायओव्हरवर रश्शीच्या मदतीने चढताना दिसून आला.