Take a fresh look at your lifestyle.

अक्षय कुमारला पुन्हा कोरोनाची लागण। Cannes Film Festival होणार मिस्ड; पोस्टद्वारे खंत केली व्यक्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आणि बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करीत त्याने स्वतःच दिली आहे. याशिवाय यंदाच्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या Cannes Film Festival साठी तो हजार राहू शकणार नाही याचे दुःख आणि खंत त्याने व्यक्त केली आहे. हा फिल्म फेस्टिव्हल मिस्ड होणं हि वेदनादायी असल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अक्षयने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्याला कोरोना झाला असून यंदाचा Cannes Film Festival तो मिस्ड करणार असल्याची माहिती दिली आहे. प्रतिष्ठित Cannes Film Festival हा येत्या १७ मे २०२२ पासून सुरू होतोय. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून आमंत्रित करण्यात आलंय. त्यामुळे अक्षय हा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह भारताचं प्रतिनिधीत्व करणार होता. त्यामुळे अक्षयला याबाबत अतिशय दुःख होत असल्याचे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. ‘कान २०२२च्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये आपल्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी तिथे मी हजर राहणार होतो. पण दुर्दैवाने माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता आराम करेन. अनुराग ठाकूर तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप शुभेच्छा!’, असं अक्षय कुमार याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे.

संपूर्ण वर्षभरात अक्षयला कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान एप्रिल २०२१ मध्ये त्याने ट्विट करीत आपल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. ‘मी सर्वांना कळवू इच्छितो की, कोरोना चाचणीचा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्व प्रोटोकॉलचं पालन करून मी ताबडतोब स्वतःला क्वारंटाइन केलं आहे. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे आणि आवश्यक वैद्यकीय सेवेची मागणी केली आहे. मी सर्वांना विनंती करतो, जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं त्याने लिहिलं होतं. यानंतर अक्षयने कोरोनावर मात केली होती आणि याची माहिती त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने दिली होती.