Take a fresh look at your lifestyle.

 ‘बेलबॉटम’चा टीझर प्रदर्शित ; अक्षय कुमार पुन्हा ‘खिलाडी’ भूमिकेत

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने (Akshay kumar) देशभक्तीपर चित्रपटांतून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोना काळात काळात त्याने आपल्या आगामी चित्रपट ‘बेलबॉटम’चे (BellBottom) शूटींग पूर्ण केले. आज अक्षय कुमारने या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.

ट्विटर वरून अक्षय कुमारने त्याच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये केवळ अक्षय कुमारचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. . ७०च्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या या ‘बेलबॉटम’(BellBottom) पँटवरूनच या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. ‘बेलबॉटम’ची रुंदी जितकी मोठी तितकीच ती फॅशनेबल, असे मानले जायचे

बेलबॉटमचा टीझर सुरू होताच थोड्या वेळाने, सूट बूट घातलेल्या अक्षय कुमारची एंट्री होते. त्यानंतर अचानक इंडियन एअरलाइन्सच्या विमानासमोर कामगाराचा गणवेश घातलेला अक्षय दिसतो. तर, पुढच्या फ्रेममध्ये तो एका टँकरवर लटकताना दिसतो आहे. या टीझरमध्ये एकाही संवाद नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.