Take a fresh look at your lifestyle.

अक्षयकुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित ; अक्षय कुमार क्वीन अंदाजात

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकची प्रशंसा झाली होती. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ३ मिनिटे ४० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एक वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. तो गर्लफ्रेंड कियारा अडवाणीच्या कुटुंबीयांना भेटायला आलेला असतो. पण तेथे आल्यानंतर एक ट्रान्सजेंडर भूत अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवतो. अक्षयला या वेगळ्या भूमिकेत पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत अक्षयने ‘लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ऑफिशिअल ट्रेलर. तुम्ही जेथे कुठे आहात तेथे थांबा आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यासाठी तयार व्हा. कारण लक्ष्मी तुमच्या भेटीला येत आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

गुडन्यूज’नंतर अक्षय आणि कियारा अडवाणी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणी नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नृत्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. पोस्टरवरून जरी हा चित्रपट गंभीर वाटत असला, तरी प्रत्यक्षात ट्रेलरमध्ये चित्रपटाची विनोदी झलक पाहायला मिळाली आहे.

येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टावर पाहता येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.