Take a fresh look at your lifestyle.

प्रचंड विरोधानंतर अखेर ‘लक्ष्मी बॉम्ब’च नाव बदलले ; ‘हे’ आहे चित्रपटाचे नवीन नाव

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठरलेल्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाच्या नावात आता बदल करण्यात आला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाच्या नावावरुन वाद सुरु होता. सर्वच स्तरातून या चित्रपटाच्या नावाला विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र, आता या चित्रपटाचं नाव बदलून लक्ष्मी इतकंच ठेवण्यात आलं आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात अक्षय कुमार व कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाची तारीख इतक्या जवळ असताना आता निर्माते शीर्षक बदलतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.भारतात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असला तरी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार निर्माते करत आहेत. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.