Take a fresh look at your lifestyle.

कुशल पंजाबीच्या मृत्यूनंतर अक्षय कुमार झाला भावूक !

चंदेरी दुनिया । काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीने गळपास लावून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्काच बसला. कुशलच्या जवळच्या मित्रमैत्रीणींनी सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केले. तसेच कुशलच्या जवळच्या मित्राने गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्याचा सामना करत असल्याचा खुलासा केला.

दरम्यान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने देखील दु:ख व्यक्त करत तरुणांना आवाहन केले आहे. कुशाल पंजाबीच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारने मीडियाशी संवाद साधला. ‘मी त्याच्या सोबत काम केले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे असतातच.

‘तुम्हाला मिळालेले आयुष्य हे फार सुंदर आहे. तुमच्या आई-वडिलांनी तुमचे पालन पोषण केले आहे. त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे. हे सांगणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. पण प्रत्येकाने आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करायला हवा. त्यासाठी त्यांनी आपला जीव देणे हे फार चुकीचे आहे’ असे अक्षय पुढे म्हणाला.

त्यानंतर अक्षयने त्याला संधी मिळाली तर तो नैराश्यावर आधारित चित्रपट नक्की कारणार असल्याचे सांगितले आहे. कारण भारतात नैराश्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे असे अक्षय पुढे म्हणाला आहे.