Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूड मधील ड्रग प्रकरणी अक्षयकुमारने प्रथमच केलं भाष्य ; व्हिडिओ शेअर करून सोडलं मौन

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली. काही जणांना अटक झाली, काही जणांची चौकशी सुरू आहे आता खुद्द अक्षय कुमारने बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.  बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा संबंध आहे, तो नाकारता येत नाही. मात्र याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्रीला टार्गेट करावा असं नाही, असं अक्षय म्हणाला आहे.

अक्षय म्हणाला, “आज खूप जड मनाने तुमच्याशी बोलत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तुम्हाला सांगण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी मनात आहेत. मात्र सगळीकडे इतकी नकारात्मकता आहे, त्यामुळे काय बोलू, कुणाशी बोलू आणि किती बोलू हेच समजत नाही आहे. भले स्टार आम्हाला म्हटलं जातं असलं तरी बॉलिवूडला तुम्ही तुमच्या प्रेमाने बनवलं आहे.

अक्षय म्हणाला, “सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी समोर आल्या. ज्यामुळे तुम्हाला जितक्या वेदना झाल्या तितक्या वेदना आम्हालाही झाल्या. सध्या ड्रग्जबाबत चर्चा सुरू आहे. मी याबाबत कसं खोटं बोलू की बॉलिवूडमध्ये ड्रग्ज नाहीच, नक्कीच आहे. जसं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असतं तसंच. मात्र प्रत्येक इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्तीचा याच्याशी संबंध असणं गरजेचं नाही. ड्रग्ज प्रकरण ही कायदेशीर बाब आहे आणि आपल्या तपास यंत्रणा जो काही तपास करतील तो योग्य असेल आणि या तपासात फिल्म इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्ती तपास यंत्रणेला पूर्णपणे मदत करेल, असा मला विश्वास आहे. पण तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही पूर्ण इंडस्ट्रीला वाईट म्हणू नका.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’