Take a fresh look at your lifestyle.

भाई नहीं गॉडफादर! अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘बच्चन पांडे’चा ट्रेलर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड इंडस्ट्रीचा खिलाडी राज्य करताना दिसतोय. कारण २ वर्षानंतर थिएटर खुली झाली आणि यानंतर अक्षय कुमारचे चित्रपट अगदी रांगेत रिलीज होताना दिसू लागले आहेत. मुख्य म्हणजे अत्यंत चर्चेत असलेला साजिद नाडियादवाला यांचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट पण लवकरच रिलीज होणार आहे. लवकरच म्हणजे येत्या होळीच्या दिवशी १८ मार्च २०२२ रोजी सर्वत्र थिटरमध्ये बच्चन पांडे धुमाकूळ घालणार आहे. या चित्रपटात बच्चन पांडेची भूमिका अक्षय कुमार साकारतोय. त्यामुळे हा चित्रपट आणि आजच रिलीज झालेला चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच चर्चेत आहे.

बच्चन पांडेचा ट्रेलर पाहिल्यानंतर कुणीही समजून जाईल कि हा चित्रपट फुल्ल पॅकेज आहे. कारण या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन आहे. कॉमेडी आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट एका गुन्हेगारावर आधारित एक हाय व्होल्टेज ड्रामा आहे. शिवाय कलाकारांची दमदार कामगिरीने आणि प्रायोगिक स्पॅगेटी बॅकग्राउंड स्कोअर, बेस्ट अॅक्शन, कमाल कॉमिक टायमिंग यामुळे चित्रपटाचा दर्जा आपोआपच वाढतोय. फरहाद सामजी दिग्दर्शित,बच्चन पांडे या चित्रपटात आधी कधीही पाहिलं नाही अश्या भूमिकेत आणि अवतारात प्रेक्षकांचा लाडका अक्की समोर येतोय. या चित्रपटात अक्षय कुमारसह, अर्शद वारसी, क्रिती सॅनन, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग, आणि जॅकलीन फर्नांडिस हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

बच्चन पांडे या चित्रपटाविषयी बोलताना निर्माता साजिद नाडियादवाला म्हणाले कि, “हा चित्रपट माझ्यासाठी अनेक कारणांसाठी खास आहे. बच्चन पांडे हा अक्षय कुमारसह नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटचा दहावा चित्रपट आणि या बॅनरखाली जॅकलिनचा आठवा चित्रपट आहे. माझ्यासाठी ही अभिमानाचा क्षण आहे. कारण आम्ही क्रिती सॅननला हिरोपंतीसोबत लॉन्च केले आणि तिने या चित्रपटात उत्तम अभिनय केला होता. त्यानंतर आता यातही ती उत्तम भूमिका बजावतेय. शिवाय फरहाद सामजी अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक असून त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट केल्यानंतर मला आशा आहे की आमच्या हातात यश आहे.”

या चित्रपटाविषयी बोलताना अक्षय कुमार म्हणाला, “साजिद नाडियाडवालासोबत काम करणे नेहमीच आनंददायी असते. कारण तो आणि मी अनेक वर्षांमागे जातो, आम्ही अभिनेता-निर्माता होण्याच्या खूप आधीपासून मित्र होतो आणि सोबत काम करताना किती मजा येते याची कल्पना तुम्ही करूच शकाल. मित्रांनो, बच्चन पांडे हा माझा त्याच्यासोबतचा दहावा चित्रपट आहे आणि प्रेक्षक या चित्रपटातून दहापट मनोरंजनाची अपेक्षा करू शकतात.” शिवाय चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक फरहाद सामजी म्हणाले, “अक्षय कुमारसोबतचा आणि साजिद नाडियादवाला यांच्यासोबत काम करणे हा सर्वात चांगला अनुभव आहे. थोडक्यात बच्चन पांडे म्हणतो तस, मला भाई नाही गॉडफादर बोलतात.पण माझ्यासाठी साजिद सर आणि अक्षय सर दोघे माझे भाई आणि गॉडफादर दोन्ही आहेत. “