Take a fresh look at your lifestyle.

अक्षय कुमार होणार जादूगार! ‘या’ फोटोमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । आनंद एल राय यांच्या “अतरंगी रे” चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमार हा जादूगाराच्या भूमिकेत दिसणार आहे. शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा फोटो शेअर करीत अक्षयने आपल्या चाहत्यांना आगामी चित्रपटाची माहिती दिली. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षय जादूगाराच्या गेट अप मध्ये दिसत आहे. या चित्रपटात अक्षय सोबत सारा अली खान आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच अक्षयचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’ या सिनेमाचा मुहूर्त आयोध्येत पार पडला. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहेत. राम सेतु चित्रपटाची सहनिर्मिती अरूण भाटिया आणि विक्रम मल्होत्रा करीत आहेत. तर डॉक्टर चंद्र प्रकाश द्विवेदी क्रिएटिव्ह निर्माते आहेत.

अक्षयने इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर करीत इतर सहकलाकारांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर आनंद एल राय यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय लेखक हिमांशू शर्मा आणि संगीतकार ए.आर.रहमान यांचेही आभार मानले आहेत. अक्षयचे येऊ घातलेले दोन्हीही चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार असून सारेच त्यांच्या रिलीज होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.