Take a fresh look at your lifestyle.

अरे अरे.. सेल्फीची हि कुठली पद्धत? अक्षय कुमारचे केस ओढून चाहत्याने केला कहर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आता चाहत्यांचं लाडक्या कलाकारांविषयी असणारं आकर्षण आणि वेड काही वेगळं सांगायची गरज आहे असं नाही. कारण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओतून हे स्पष्ट दिसत असतं. कधी कधी हे चाहते इतकं टोकाचं काही करून जातात कि काही विचारायला आणि सांगायलाच नको. अलीकडेच अक्षय कुमारचा आपल्या चाहत्यांच्या गर्दीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्याने केलेला प्रताप पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. एका चाहत्याने सेल्फीसाठी चक्क अक्षय कुमारचे केस ओढल्याचे यामध्ये दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कि, अभिनेता अक्षय कुमार आपल्या चाहत्यांच्या तुडुंब गर्दीतून निघत आहे. दरम्यान तो जात असताना जो तो त्याला पाहण्यासाठी आणि मुख्य म्हणजे त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत आहे. अशातच एक चाहता अगदी बाकीच्यांच्या अंगाखांद्यावर चढून अक्षयसोबत किमान एक सेल्फी मिळावा म्हणून काहीही करतोय. यातच तो सेल्फी मिळायलाच हवा अशा हट्टाने अक्षय कुमारचे केस धरतो आणि त्याला ओढतो. या कृत्यास खिलाडी भडकतो आणि त्याचा हात झटकून टाकतो. शिवाय त्याला असे न करण्यास बजावतानाही दिसतोय. आता केस ओढल्यानंतर अक्षय कुमारलाही आई ग.. असा फील येणं साहजिक आहे ना.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अक्कीचे अनेक चाहते भरभरून प्रतिक्रिया देत त्या चाहत्यांवर संताप व्यक्त करत आहेत. इतकेच नव्हे तर अनेकांनी त्या चाहत्याला चांगलेच फटकारले आहे. या व्हिडिओतून हेच दिसून येतंय कि, कलाकारांचं क्रेझ चाहत्यांचा असं काही वेड लावत कि चाहते फोटोच्या नादात आपली हद्द पार करतात. याचं उत्तम उदाहरण जणू या चाहत्याने सेट केलं आहे. दरम्यान अक्षयसोबत त्याचे बॉडीगार्ड असूनही अशी परिस्थिती निर्माण होणं थोडी अवाक करणारी बाब आहे. मात्र एवढ्या मोठ्या गर्दीला नियंत्रित करणं त्यांच्यासाठीही दिव्यच आहे. यामध्ये कौतुकाची बाब अशी की, हि परिस्थिती अक्षयने संयमितपणे हाताळली आहे.