Take a fresh look at your lifestyle.

‘इस बार उनकी हार’; अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षापासून कोरोनामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख रोज पुढे पुढे ढकलली जात होती. अक्षय कुमारचा बेल बॉटम. ह्या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाल्यापासून चित्रपटाबाबत एक वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता प्रतीक्षा संपणार असे दिसत आहे. कारण लवकरच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बेलबॉटम प्रदर्शित होत आहे. इतकेच नव्हे तर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.

हा चित्रपट विमान अपहरणावर आधारीत आहे. याचे शीर्षक बेटबॉटम असून हा एक कोडवर्ड आहे. अर्थात एका गुप्तहेराचे सांकेतिक नाव आहे. या गुप्तहेराची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या निभावत आहे. तर विमानातील २१२ प्रवाशांना वाचवण्याचे मिशन त्याच्याकडे सोपविण्यात आल्याचे या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग दुबई, स्कॉटलंडमध्ये झाले आहे. त्यामुळे विविध ठिकाणांचे दर्शन यात घडेल. या चित्रपटाची स्टार कास्ट देखील मजबूत असल्यामुळे चित्रपटातील अभिनय अव्वल आहे. तर कथानक वाह भाई वाह.

बेल बॉटम मध्ये अक्षय कुमार याच्याबरोबर लारा दत्ता, वाणी कपूर, आदिल हुसेन, हुमा कुरेशी देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित तिवारी यांनी केले आहे. तर दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यापूर्वी अक्षय कुमारच्या वाढदिवसाचे निमित्त साधून  ‘बेलबॉटम’च्या निर्मात्यांनी चित्रपटातील अक्षय कुमारचा नवीन लूक असलेला फोटो रिव्हिल केला होता. या लूकचे पुढे पोस्टरही लॉन्च झाले आणि अक्षयच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली. त्यानंतर, आज ट्रेलर रिलीज झाला आहे आणि लवकरच चित्रपटही प्रदर्शित  होईल.