Take a fresh look at your lifestyle.

मेरे याराssssss मेरे यारा! अक्षयावर चढलाय हार्दिकच्या प्रेमाचा रंग; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अत्यंत गाजलेली मालिका तुझ्यात जीव रंगला आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर यातील प्रत्येक पात्र इतकं गाजल होत की आजही नुसत्या नावाने लोक ओळखतात. त्यात राणा दा आणि पाठक बाईंचं काही विचारूच नका… त्यांची तर जोरदार हवा आहे भाऊ.. आणि आता तर ही रील लाईफ जोडी रियल लाईफ मध्ये मिस्टर मिसेस होतेय त्यामुळे नुसता आनंदी आनंद आहे. साखरपुड्यानंतर आता यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अक्षयाने स्वतः शेअर केलेले व्हिडीओ चांगलेच गाजताना दिसत आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या रील जोडीने खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एकमेकांचा हात कायमसाठी धरला आहे. त्यांनी साकारलेल्या राणा आणि अंजली या पात्रांवर जेव्हढं प्रेक्षकांनी प्रेम केलं तेव्हढंच प्रेम आता प्रेक्षक हार्दिक आणि अक्षयावर करताना दिसत आहेत. साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच अक्षयाने हार्दिकसोबतचे रोमॅंटिक व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ तिने हार्दिकसाठी तयार केले आहेत यात काही शंकाच नाही. पण या व्हिडीओचे विशेष आकर्षण म्हणजे, यामध्ये तिने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेपासून ते साखरपुड्यापर्यंतचे अनेक फोटो एकत्र करीत हा व्हिडीओ तयार केला आहे.

या व्हिडिओच्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये सूर्यवंशी चित्रपटातील मेरे यारा हे गाणे वाजत आहे. तर आणखी एका व्हिडिओमागे तेरे नाल हे गाणे वाजत आहे. या दोघांचे हे दोन्ही रोमॅटिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अक्षया आणि हार्दिकने पहिल्यांदाच एकत्र ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केलं आणि यानंतर अंजली बाई आणि राणा दा खरोखर यांचा जीव एकमेकांमध्ये रंगला आहे. सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेतच सोबत हे व्हिडिओदेखील व्हायरल होत आहेत. आता लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत त्यामुळे हार्दिक आणि अक्षयाचे चाहते अत्यंत आनंदी आहेत.