Take a fresh look at your lifestyle.

आ लेका… शेवटी पाठक बाईंचा जीव राणा दा’मध्ये रंगलाच; साखरपुड्याचे फोटो व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| झी मराठीवरील अत्यंत गाजलेली मालिका तुझ्यात जीव रंगला आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर यातील प्रत्येक पात्र इतकं गाजल होत की आजही नुसत्या नावाने लोक ओळखतात. त्यात राणा दा आणि पाठक बाईंचं काही विचारूच नका… त्यांची तर जोरदार हवा आहे भाऊ आणि आता काय ही रील लाईफ जोडी रियल लाईफ मध्येसुद्धा एकरूप झाली आहे. होय. अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचा आज साखरपुडा संपन्न झाला आहे.

 

 

आज दिनांक ३ मे २०२२ मंगळवार रोजी अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त साधत अक्षय आणि हार्दिकने एकमेकांना हात कायमचा हातात घेतला आहे. हा साखरपुढ्याचा सोहळा मुंबईतील ठाणे येथे पार पडला. सध्या सोशल मीडियावर हार्दिक आणि अक्षयाच्या साखर पुड्याची चर्चा आहे. त्यांचे चाहते या बातमीने प्रचंड खुश झाले आहेत. त्यात सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुडा सोहळ्याचे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये अक्षया आणि हार्दिकची जोडी कमाल दिसतेय यात काही वादच नाही.

आपल्या साखरपुड्याबाबत अत्यंत गोपनियता राखून अक्षया आणि हार्दिक यांनी चाहत्यांसह सर्वांनाच आनंदाचा धक्का दिला आहे. एकंदरच ही बातमी चाहत्यांसाठी सुखद धक्का होती असे म्हणायला हरकत नाही. सध्या सोशल मीडियावर वाह राणा दा… जिंकलास लेका… शेवटी पाठक बाई वहिनी बाई झाल्याचं अशा कमेंट येताना दिसत आहेत.