Take a fresh look at your lifestyle.

अली असगरने नाल्यात भाज्या धुणाऱ्या फेरीवाल्याचा व्हिडीओ केला शेअर ; कोरोनाची उडवली खिल्ली

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन ।  अली असगरने नाल्यात भाज्या आणि भांडी धुणाऱ्या फेरीवाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला चिमटा काढला आहे.  कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अनेक लोक प्रवास करणं टाळत आहे. सिनेमांच्या रिलीज तारखाही बदलल्या जात आहेत. अनेक अभिनेत्यांनी आपले दौरे ही रद्द केले आहेत.

[wpvideo iCT606hA]

 सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना अली म्हणतो, कोणता व्हायरस आपल्याला स्पर्श तरी करू शकतो का ? सांगा बरं. यासोबतच त्यांनी इमोजीही शेअर केली आहे. अलीनं शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अलीच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान देशात कोरोना व्हायसची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात 74 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता सर्वच लोक खबरदारी घेताना दिसत आहेत. नुकतीच सूर्यवंशी सिनेमानंही आपली रिलीज डेट टाळली आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता.