Take a fresh look at your lifestyle.

स्वप्न चालून आले बघता बघता.. ; लग्नबंधनात अडकले आलिया- रणबीर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे इंडस्ट्रीतील क्युट आणि बहुचर्चित कपल अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट अखेर आज लग्नबंधनात अडकले आहे. हे लग्न इंडस्ट्रीतील भव्य लग्नांपैकी एक मानले जात आहे.

या लग्न सोहळ्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती. यानंतर अखेर आज तो क्षण आलाच. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी
हजेरी लावली होती. हे नातं अगदी मैत्रीपासून सुरू झाल आणि आज एका अशा नात्यात परिवर्तित झाले जे अतूट आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणार एक व्हिडीओ सांगतोय कि हे लग्न एक स्वप्न होते जे बघता बघता आज पूर्ण झाले आहे.

हा व्हिडीओ आलियाचे रणबीरवर असलेले प्रेम दर्शवतो आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या माध्यमातून तिने इंडस्ट्रीत डेब्यू केले. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आलिया म्हणाली होती कि, “होय, मी रणबीर कपूरवर प्रेम करते आणि बर्फी पाहिल्यानंतर मी आणखी जास्त करायला लागले.

तो माझा क्रश आहे आणि नेहमीच माझा क्रश राहिल.” हा प्रसंग १० वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी रणबीर आणि आलियाचे आयुष्य पूर्णपणे वेगळे होते. त्यावेळी रणबीर कपूरचे नाव कॅटरिनासोबत जोडले होते. पण नशीब पहा. आधी क्रश.. मग मित्र.. मग प्रेम आणि आता सात जन्माचा जोडीदार.

मुंबईत अगदी मोजक्या आणि जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिया आणि रणबीरने लग्नगाठ बांधली. या लग्न सोहळ्याला करण जोहर, करिना कपूर, भट्ट कुटुंबातील सदस्य, सैफ अली खान यांच्यासह काही दिग्गजांनी हजेरी लावली होती.

तर आलियाची आई, सोनी राजदान यांचे फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगवेगळे मेनू तयार केले गेले होते. ज्याची चर्चा सगळीकडे होते. तसेच लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाची तयारी इतकी हटके होती कि उपस्थितांच्या हा सोहळा लक्षात राहील.