Take a fresh look at your lifestyle.

‘या’ गोड चिमुकलीला ओळखलंत काय? सध्या आहे बाॅलिवुडची ‘क्विन’

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री अलिया भट फिल्म इंडस्ट्रिमधील क्विन बनली आहे. राझी आणि गली बाॅय या चित्रपटांच्या यशानंतर अलिया यशाच्या शिखरावर पोहोचली. आज आलियाचा २७ वा वाढदिवस आहे. वडिल महेश भट यांच्या सोबतचा आलियाचा एक जुना फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

आलियाचे बालपणीचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. आलिया लहान असताना खूपच गोड दिसत होती. आलियाचा बालपणीचा क्युट लूक तिच्या चाहत्यांना भावला आहे. आलियाचे जुने फोटो शेअर करुन चाहते आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

आलियाचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी झाला. वडिल महेश भट आणि आई सोनी राजदान यांची आलिया ही दुसरी मुलगी आहे. आलियाच्या चित्रपटशृष्टीतीप यश पाहून तिचे आई वडिल चांगले खूष आहेत. नुकताच आलियाने आपला वाढदिवस बाॅयफ्रेंड रणवीर आणि कुटुंबियांसोबत साजरा केला.