Take a fresh look at your lifestyle.

आलिया भट्टची संपत्ती ऐकून व्हाल थक्क! फिल्म व्यतिरिक्त ‘या’ कामातून करते कोटींची कमाई

मुंबई | बाॅलिवुड इंडस्ट्रितील सर्वात गोड अभिनेत्री म्हणुन ओळख असणारी आलिया भट्ट आज २७ वर्षांची झाली आहे. स्टुडंट आॅफ द इयर या चित्रपटातून बाॅलिवुडमध्ये धडाकेबाज एन्ट्री करणारी आलिया सध्या इंडस्ट्रितील टाॅपची अभिनेत्री आहे. तसेच तुम्हाला एेकुन धक्का बसेल मात्र आलियाच्या एकटीच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती आहे.

फोर्ब्स इंडियाने मागील वर्षी टाॅप १०० सेलेब्रिटींची यादी जाहीर केली होती. फोर्ब्सच्या यादीत आलियाचे नाव आठव्या क्रमांकावर होते. बाॅलिवुडमधील सर्व कलाकारांमध्ये ती सर्वांत टाॅपला होती. फोर्ब्सच्या नुसार अलियाने २०१८ साली ५८ करोड रुपयांची कमाई केली तर २०१९ साली ५९ कोटींची कमाई केली. आलियाचा कमाईचा मुख्य सोर्स चित्रपट असला तरी ती अन्य बरीच कामे करते ज्यातून तिला करोडो रुपये मिळतात.

आलिया एक युट्युब चॅनल चालवते. युट्यूबवर आलियाला १.३३ मिलियन सबस्क्रायबर आहेत. तिचा प्रत्तेक व्हिडिओला ४० ते ५० लाख व्ह्यिज मिळतात. तेव्हा आलियाला युट्यूबवरुन चांगले पैसे मिळत असल्याचे समजते. याबरोबरच आलियाने अनेक स्टार्टप्समध्ये आपले पैसे गुंतवले आहेत. अभिनयासोबतच आलिया एक चांगली बिझनेसमन सुद्धा आहे. तसेच आलिया अनेक बड्या ब्रेंडकरता जाहिरात करते. यामध्ये फ्लिपकार्ट, वुबर इट्स आदींचा समावेश होतो. आलिया सोशल मिडिया पोस्ट मधूनही कमाई करते. तिच्या एका पोस्टसाठी १ कोटी मिळतात असे म्हटले जाते.

हे पण वाचा –

अमिर खान ने घरातून पळून जाऊन केले होते ‘पहिले’ लग्न! जाणुन घ्या लव्हस्टोरी

बर्थडे स्पेशल: तब्बूच्या साडी प्रेस पासून ते काजोलच्या स्पॉटबॉयपर्यंत रोहित शेट्टीने केले सर्व काही

अबब … इंस्टाग्रामच्या एका पोस्टसाठी बॉलीवूड सेलिब्रेटी घेतात ‘इतके’ मानधन…

मुख्यमंत्र्याचा पोरगा म्हणुन जेनेलिया रितेशला इग्नोर करत होती पण..

जेनेलियात गुंतलेला रितेश पुन्हा एकदा म्हणतोय, “तुझे मेरी कसम”