Take a fresh look at your lifestyle.

एक डिसलाईकमुळे तुमचं महत्त्व कमी होऊ शकत नाही ; आलिया भट्टने टीकाकारांना सुनावले

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. बॉलीवूड मधील घराणेशाही, गटबाजी , ड्रग्स प्रकरणामुळे बॉलीवूडची बदनामी होऊन अनेक बड्या कलाकारांने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर नेपो किड म्हणून ओळख झालेल्या अभिनेत्री आलिया भट्टवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. हे प्रकरण एवढ्यात संपलं नाही, तर तिच्या चित्रपटाला चाहत्यांनी विरोध दर्शवला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला ‘सडक २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. याशिवाय असंख्य डिसलाईकचा सामना चित्रपटाला करावा लागला. 

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. ‘आज कौतुकाचा दिवस आहे. त्यामुळे माझे कुटुंब, मित्रपरिवार आणि चाहत्यांचे आभार मानते ज्यांच्यामुळे माझ्या चाहत्यांची संख्या ५० मिलियनवर पोहोचली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये मी फार काही शिकली आहे. सोशल मीडिया आपल्याला एकत्र बांधून ठेवतो. आपल्याला उत्साहित ठेवतो. पण त्यामध्ये आपण कोठेच नसतो.

आपल्या आयुष्यात नात्यांचे महत्त्व फार आहे. पण यामध्ये स्वतःला ओळखणं, स्वतःवर प्रेम करणं तितकच महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर एक लाईक किंवा डियलाईकचं बटण दाबलं की आपलं महत्त्व कमी होत नसल्याचं ती म्हणाली. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’