Take a fresh look at your lifestyle.

आलिया- रणबीरने लग्नाआधीच केली होती मानसिक आईपणाची तयारी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लवकरच आमच बाळ येतंय असं लिहीत अभिनेत्री आलिया भट्ट कपूरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. यामध्ये तिने सोनोग्राफी वेळी क्लिक केलेला एक फोटो आणि सोबत सिंहाच्या कुटुंबाचा एक फोटो शेअर करीत आपल्याकडे एक गोड बातमी आहे असे चाहत्यांना सांगितले. आता रणबीर आणि आलिया आई-बाबा होणार असल्याची बातमी समजताच त्यांचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. पण काही नेटकरी मात्र प्रचंड ट्रोल करताना दिसत आहेत. त्यामुळे अखेर आलियाने आपले मौन सोडले आहे.

कपूर कुटुंबात चिमुकला पाहून येणार म्हणून सारे कुटुंबिय आनंदी असतात. यावेळी आलियाने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जे सांगितलं ते वाचल्यानंतर लग्नानंतर तिचं लगेच आई होण्याचं कारण ट्रोलर्सच्या कदाचित लक्षात येईल. बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करणारा आलियाचा गंगुबाई काठीयावाडी’च्या प्रमोशनदरम्यान आलियाने आई होण्याबाबतची काही मतं मांडली होती. यावेळी ती मते ट्रोलर्ससाठीच मांडली होती का काय..? असे भासत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी २ महिन्याआधी लग्न आणि आता लगेच गर्भारपण यावरून आलिया रणबीरला खूप ट्रोल केलं आहे. त्यामुळे आलियाच्या मुलाखतीचा आता पुन्हा एकदा उल्लेख केला जात आहे.

एका मुलाखतीत बोलताना आलियाने आपल्या खाजगी आयुष्याबाबत सांगितले कि, ‘लोकांना मी वयाच्या तीसाव्या वर्षी लग्न करणे अपेक्षित होते.पण त्याआधीच लग्न करून मी लोकांना चकीत केले होते. पण त्यामागचं खरं कारण सांगायचं झालं तर मला असं वाटतं की, जेव्हा मी जबाबदारी घेण्यास तत्पर आहे असं मला वाटेल तेव्हा मला लग्न करायचं होतं. मला कायम असं वाटायचं माझा लग्नाचा निर्णय हा तेव्हा ठाम असेल जेव्हा मी आई होण्याची जबाबदारी घेऊ शकेल. म्हणून जेव्हा माझी आई होण्याची ठाम तयारी असेल तेव्हाच लग्न करेन. त्यामुळे मला असे वाटताच मी आणि रणबीरने लग्न करण्याचा निर्णय घेतला.