Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता ..? आलिया- रणबीरने फक्त 4 फेऱ्यात बांधली 7 जन्माची गाठ?; जाणून घ्या सविस्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गुरुवारी १४ एप्रिल २०२२ रोजी जवळच्या नातेवाईंच्या हजेरीत आलीया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा विवाह सोहळा पार पडला. दरम्यान हे लग्न अतिशय शाही पद्धतीने मात्र शेवटपर्यंत गौप्य साधत पार पडले. मीडियाला कुणकुण न लागून देता हा विवाह सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान या विवाह सोहळ्याविषयी एक जबरदस्त खुलासा करण्यात आला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत, आलियाचा भाऊ राहुल भट्ट याने सांगितले कि, रणबीर आणि आलियाने त्यांच्या लग्नात सात नव्हे तर फक्त चार फेरे घेतले. हे खरोखरच फार विशेष आणि लक्षवेधी आहे. तसेच हि बाब आकर्षक असल्याचेही राहुलने म्हटले आहे.

आलियाचा भाऊ राहुल भट्ट याने माध्यमांना सांगितले कि, रणबीर आणि आलियाने त्यांच्या लग्नात फक्त चारच फेरे घेतले. त्यांच्याकडे खास पंडित होते. ज्या समारंभात भावांची गरज होती, त्या समारंभात मी महत्त्वाची भूमिका बजावत होतो. उपस्थित पंडित यांनी प्रत्येक फेरा किती महत्वाचा आहे याबाबत स्पष्टीकरण दिले.

जसे कि, “एक होता है धर्म के लिए (एक असतो धर्मासाठी), एक होता है संतान के लिए (एक असतो मुलांसाठी). त्यामुळे हे सर्व खरोखरच फार आकर्षक होते. हे आमच्या समोर कधी आलेलेच नाही. कारण मी विविध जातींच्या कुटुंबातून आलोय. तर, हे माझ्यासाठी आकर्षक होते. रणबीर आणि आलियाचे लग्न ज्या पंडितांनी लावले ते गेल्या बऱ्याच काळापासून कपूर कुटुंबाचा एक भाग आहेत.

रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फोटो हे आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहेत. त्यांचे लग्नाचे फोटो अगदी एखाद्या स्वप्नासारखे वाटत आहेत. एखादे कल्पनेतील स्वप्न अचानक सत्यात उतरावे असे काहीसे हे फोटो भासत आहेत. या फोटोंमध्ये आलीया आणि रणबीर अगदी मेड फॉर इच अदर वाटत आहेत. दोन वेगवेगळी आयुष्य जगणारे आलिया आणि रणबीर यांची मैत्री २००७ मध्ये डेटिंग स्वरूपात परिवर्तित झाली. यानंतर गुरुवारी २०२२ सालात त्यांनी एकमेकांचा हात जन्मोजन्मासाठी धरला आहे.