तेरे चेहरेसे नजर नहीं हटती! Mrs. कपूरला पाहून Mr. कपूर घायाळ; वेडिंग फोटो झाले व्हायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे क्युट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गुरुवारी, १४ एप्रिल २०२२ रोजी सात जन्माची गाठ बांधून आपल्या कुटुंबासमोर रितीरिवासहित विवाहबंधन स्वीकारले. त्यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केले. यानंतर आलियाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. चाहत्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून या नवविवाहित जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सध्या सोशल मीडियावर मिस्टर आणि मिसेस कपूर ट्रेंड करत आहेत.
अखेर मिस भट्ट मिसेस कपूर झाली आणि या दाम्पत्याने त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आलीयाने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आलिया आणि रणबीर दोघेही फार सुंदर दिसत आहेत. त्यांनी ऑफ व्हाईट रंगाचे शाही वधू वर विशेष कपडे परिधान केले आहेत. आलियाचे निखळ सौंदर्य आणि हास्य दोन्हीही भुरळ पाडणारे आहे. त्यामुळे मिस्टर कपूरसुद्धा त्यांच्या नजरेला अडवू शकलेले नाहीत. या फोटोंमध्ये आलीया रणबीरचे एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांबाबतची ओढ दिसून येत आहे. रणबीर तर आलियापासून एक क्षणही नजर हटवताना दिसत नाही.
या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. इतकेच नव्हे तर चाहत्यांनी देखील अभिनंदनपर कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान या विवाह सोहळ्यासाठी खास आणि जवळच्या पाहुणे मंडळींची उपस्थिती होती. यामध्ये नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर, करण कपूर, रिमा जैन, करीना कपूर, करिश्मा कपूर, सैफ अली खान, अर्मान कपूर, महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान, अयान मुखर्जी, करण जोहर, आकांक्षा कपूर आणि अनुष्का कपूर या सेलिब्रटींचा समावेश आहे.
रणबीर कपूरने सावरिया या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. यानंतर अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले होते. यामध्ये सर्वात आधी दीपिका पदुकोणसोबत तो रिलेशन मध्ये असल्याचे समोर आले. दरम्यान दीपिकाने त्याच्या नावाचा टॅटूसुद्धा काढला होता. त्यांनी बचना ए हसींनो चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर राजनीती चित्रपटादरम्यान रणबीर कॅटरिनाची जवळीक वाढली आणि दीपिकाने नाते तोडले. यानंतर कॅट- रण बराच काळ एकत्र होते पण लग्नापर्यंत पोहोचले नाहीत. अखेर २००७ सालापासून रणबीर आलियासोबत डेट करू लागला. याचा निकाल असा कि आज ते दोघे अधिकृत पती पत्नी झाले आहेत.