Take a fresh look at your lifestyle.

आलियाची प्रेग्नेंसी फॅशन; शॉर्ट ड्रेसला करून Bye, क्युट ड्रेसला केलं Hi

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्याला हवं ते परिधान करणारी हॉट, बोल्ड आणि क्युट अभिनेत्री आलिया भट्ट कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता रणबीर कपूरसोबत साता जन्माची गाठ बांधल्यानंतर आता ते दोघे लवकरच आई बाबा होणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः आलियाने सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली होती. यानंतर तिचे चित्रपट तिच्यासाठी जेव्हढे चर्चेचा विषय झाले नाहीत तेव्हढी तिची प्रेग्नेंसी चर्चेत राहिली. यानंतर आता आलियाने प्रेग्नेंसी केअरला सुरुवात केली आहे. त्यामुळे शॉर्ट ड्रेस घालणारी आलिया आता प्रेग्नेंसी वेअर परिधान करताना दिसते आहे.

प्रेग्नेंसीदरम्यान होणारी बेबी बंप लपविण्यासाठी अभिनेत्री विविध डिझाईनर प्रेग्नेंसी वेअर कपडे परिधान करताना दिसतात. ज्यामध्ये एखाद्या सोहळ्या दरम्यान किंवा अगदी फोटोशूटवेळीसुद्धा त्यांचं बेबी बंप दिसून येत नाही. सध्या आलियाने सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटोदेखील असेच काही आहेत. आलिया पहिल्यांदाच शॉर्ट ड्रेस नव्हे तर फुल लेयर ड्रेसेसमध्ये दिसली आहे. मुख्य म्हणजे या ड्रेसेसमध्ये आलिया तितकीच क्युट दिसतेय जितकी तिच्या कॉमन फॅशन वेअर मध्ये ती दिसते. या ड्रेसेसमध्ये आलियाचे बेबी बंप दिसत नसले तरी चेहऱ्यावरील आईपण मात्र दिसून येत आहे.

आलियाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या कपाळावरील टिकली तिच्या सौंदर्यात आणखीच भर घालते आहे. हे फोटो सोशल मीडियावरील ट्रेंडिंग फोटोंपैकी एक झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर या फोटोवर आलियाचे चाहते आणि इतर इंडस्ट्रीतील कलाकारदेखील भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने तर प्रेग्नेंसीमध्ये आलियाच्या चेहऱ्यावरील ग्लो मार्क करणारी कमेंटही केली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री आलिया भट्टचा ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आलिया तिचे बेबी बंप लपवत हे फोटोशूट करत आहे आणि तिचा हा फॅशन ट्रेंड चांगलाच व्हायरल होतो आहे.