हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आई होणार आहे हे आपण सारेच जाणतो. यामुळे तिचे चाहते आणि कुटुंबीय सगळेच खूप खुश आहे. शिवाय ती पहिल्या आईपणात अत्यंत मग्न आहे. तिच्या चेहऱ्यावरील मातृत्व सुखाचा आनंद नेहमीच सगळ्यांना प्रफुल्लित करीत असतो. अलीकडेच ती आणि रणबीर बेबीमूनसाठी इटलीला देखील गेल्याचे समोर आले होते. एकंदरच काय तर आलीया आपली प्रेग्नेंसी एन्जॉय करतेय. पण बेबी बंप फ्लॉन्ट करताना आलीया नेहमीच एक पाऊल मागे घेते. यावेळी तर तिने बेबी बंप लपविण्यासाठी चक्क ओव्हरसाईज ड्रेस परिधान केला होता. या दर्समधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अलीकडेच आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. यानंतर आता आलिया भट्ट तिच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त दिसतेय. मुख्य म्हणजे या चित्रपटात ती तिचा पती रणबीर कपूर याच्यासोबत लग्नानंतर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी फार स्पेशल आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती ओव्हरसाईज ड्रेस परिधान केल्याचे दिसले. तिने बेबी बंप लपविण्यासाठी प्रिंटेड ओव्हरसाइज टी-शर्ट वेअर केला होता.
आलियाला प्रेग्नन्सीबाबत समजल्यापासून ती फार खुश आहे यात काही वादच नाही. पण ती तिच्या ड्रेसिंगमध्येही बदल करताना दिसली आहे. नेहमीच शॉर्ट आणि क्युट ड्रेसिंग करणारी आलीया आता लॉन्ग, फ्लेरी, ओव्हरसाईज ड्रेस परिधान करणे पसंत करते. यामुळे तिचा बेबी बंप दिसून येत नाही. शिवाय आलिया जितकी आनंदी आहे तितकाच आनंदी रणबीरसुद्धा आहे. अनेकदा तो आलियाला सांभाळताना आणि होणाऱ्या बाळाविषयी बोलताना दिसला आहे. आपण बाबा होणार याचा काही वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच झळकत असतो.
Discussion about this post