हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाखाली लखनौमध्ये कोट्यावधी फसवणूक करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईस्थित आयओसिस स्पा आणि वेलनेस कंपनीचे एमडी किरण बावा आणि संचालक विनय भसीन यांच्यासह सहा जणांवर फसवणूक केल्याच्या आरोपावरून हजरतगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी यांना त्यांच्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सांगताना आकर्षक कमाई करुन पैसे गुंतविल्याचा आरोप दोघांवर आहे.
बिझनेसमन रोहितवीर सिंग म्हणतात की किरण बावाने शिल्पा शेट्टी या आपल्या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत असे सांगून आकर्षक कमाईची ऑफर देऊन फ्रँचायझी दिली. किरण बावाच्या वश मध्ये येउन त्यांनी कंपनीत कोट्यावधींची गुंतवणूक केली. कंपनीच्या अधिका्यांनी नुकसान झाल्यास हे केंद्र बंद ठेवण्याची धमकी दिली. या प्रकरणात एसीपी हजरतगंज अभय कुमार मिश्रा म्हणाले की, आयओएसएस स्पा कंपनीचे एमडी आणि संचालक यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
रोहितवीरने पुढे खुलासा केला की, 2018 मध्ये आयओसिस स्पा ऍण्ड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मॅनेजरने त्यांना सांगितले की कंपनीचे फ्रेंचाइजी हजरतगंजमध्ये चालू केले गेले आहे . जर तो गुंतवणूक करण्यास तयार असेल तर कंपनी त्याला फ्रेंचाइजी देऊ शकते. शिल्पा शेट्टी या कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडर आहेत आणि त्यांच्या फ्रेंचाइजी च उदघाटन सुध्दा त्याच करणार असल्याचे किरण बावा यांनी सांगितले होते. एवढेच नव्हे तर किरणने शिल्पा शेट्टी यांचे कंपनीचे प्रमोशन करणारे अनेक फोटोही दाखवले.