Take a fresh look at your lifestyle.

अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची कमाल; काही दिवसांत मिळवले तब्बल ‘इतके’ कोटी व्ह्यूज

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | स्टाईलीश स्टार अल्लू अर्जुन भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचे दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता हिंदी भाषेतही डब होऊ लागले आहेत. अल्लूचा ‘अला वैकुंठापुरामाल्लू’ हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या शिवाय त्याच्या आणखी एका चित्रपटाने अनोखा विक्रम केला आहे. अल्लू अर्जुनचा ‘सराईनोडू’ हा चित्रपट युट्यूबवर तब्बल ३० कोटी वेळा पाहिला गेला आहे.

गोल्डमाइंस टेलीफिल्म्मने ट्विट करुन ‘सराईनोडू’ युट्यूबवर ३० कोटी वेळा पाहिला गेल्याची माहिती दिली. “सराईनोडू युट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे.” असं ट्विट त्यांनी केलं आहे. ‘सराईनोडू’ हा अल्लू अर्जुनच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. हा एक तेलुगु चित्रपट आहे. या चित्रपटाचं हिंदी डबिंग गोल्डमाइंस टेलीफिल्म या कंपनीने केलं होतं. टिव्हीवर या चित्रपटाला सुरुवातीला केवळ १.१३ रेटिंग मिळाली होती. परंतु टिव्हीवर फ्लॉप झालेल्या या चित्रपटाने युट्यूबवर मात्र कमाल केली. तब्बल ३० कोटींपेक्षा अधिक वेळा हा चित्रपट पाहिला गेला आहे.

सराईनाईडू’ या चित्रपटात आर्मीमधून निवृत्त झालेल्या एका जवानाची स्टोरी दाखवण्याच आली आहे. या चित्रपटात अल्लूसोबत कॅथरीन ट्रेसा व रकूल प्रित सिंग या अभिनेत्री झळकल्या आहेत. हा एक अॅक्शन विनोदी चित्रपट आहे.

Comments are closed.