Take a fresh look at your lifestyle.

‘राम सेतू’च्या सेटवर कोरोनाचा उद्रेक! अक्षय कुमारसह ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी केली असता, आपला रिपोर्ट पॉसिटीव्ह असल्याची माहिती त्याने आपल्या सोशल मीडियावरून दिली होती. सध्या त्याचा आगामी चित्रपट राम सेतू चे शूट सुरु होते. दरम्यान सेटवरील तब्बल ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या सेटवर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार आढळल्याने शूटिंग थांबविण्यात आले आहे.

अभिनेता अक्षय कुमार यालाही आता पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. ‘राम सेतू’ या चित्रपटाचे शूटिंग मुंबईतील मड आयलंड येथे सुरू होते. चित्रीकरणासाठी जवळपास १०० ज्युनिअर आर्टिस्ट रविवारी सेटवर येणार होते. मात्र चित्रपटाचे निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक केल्यानं प्रत्येकाची चाचणी घेण्यात आली आणि यात ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तातडीने शूटिंग थांबविण्यात आले असून या सर्व जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो या चित्रपटाच्या सेटवर शूटींग करत होता. शूटिंग सेटवरील ४५ ज्युनिअर आर्टिस्टला कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचे शूटींग पुढे ढकलण्यात आले आहे. जवळपास १५ दिवसांनंतर या चित्रपटाचे शूटींग पुन्हा सुरु होणार आहे. कोरोनाच्या या विळख्यात अभिनेता अक्षय कुमार व्यतिरिक्त बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट, कार्तिक आर्यन, आमिर खान, रुपाली गांगुली यांचाही समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.