Take a fresh look at your lifestyle.

लता मंगेशकर हेल्थ अपडेट: दीदींना कोरोनासोबत न्यूमोनियाची लागण; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या त्या ९२ वर्षांच्या असून तब्येतीच्या तक्रारींमुळे सतत त्रस्त असतात असे वारंवार सांगण्यात येत होते. यानंतर त्यांच्या भाचीकडून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळाली असता त्यांनी सांगितले होते कि, दीदींची प्रकृती स्थिर आहे. शिवाय त्यांच्या देखरेखीसाठी उत्तम डॉक्टरांची टीम नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे तूर्तास चिंतेचे कारण नाही. मात्र कोरोनासोबत आता न्यूमोनियाची लागण झाल्यामुळे डॉक्टरांनीही त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, लता दीदींना कोरोनामुळे न्यूमोनिया झाला आहे. त्यामुळे कोरोनासोबत न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती म्हणावी तितकी उत्तम नाही. त्यामुळे सध्या त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना भेटू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. बुधवारी लता दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याचा अहवाल शेअर केला आहे. यामध्ये दीदी अजून काही दिवस आयसीयूमध्येच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय पुढील १० ते १२ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल असेही सांगितले. याच अहवालात त्यांनी सांगितले कि दीदींना कोरोनासोबत न्यूमोनियाचाही त्रास झाला आहे. मात्र त्या औषधांना योग्य तो प्रतिसाद देत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणेची अपेक्षा आहे. लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आल्यापासून त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. या माहितीनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे.

लता मंगेशकर एक भारतीय पार्श्वगायिका आहेत. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पार्श्वगायिका म्हणून त्यांचा उल्लेख आहे. आजतागायत त्यांना हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि छत्तीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात मुख्यतः हिंदी आणि मराठी भाषेचा उल्लेख आहे. लता मंगेशकर यांना गानसम्राज्ञी, गानकोकिळा आणि राष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, BFJA पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका, फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार याशिवाय पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, लीजन ऑफ ऑनर या पुरस्कारांचा समावेश आहे.