Take a fresh look at your lifestyle.

मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडिओची जोरदार बाजी; जाणून घ्या पुरस्कारांची यादी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2K21 मध्ये जोरदार बाजी मारली आहे. अॅमेझॉन ओरिजिनल ‘द फैमिली मैन’ पासून अगदी क्राईम ड्रामा वेबसिरीज ‘मिर्जापुर 2’, ‘शेरनी’ यासह ‘सोरारई पोटरू’ या एकापेक्षा एक अश्या दर्जेदार वेबसीरीज आणि चित्रपटांचा मोठा समावेश आहे. भारतीय कंटेंटच्या मनोरंजन श्रेणीला जगभरात प्रदर्शित करणारा मेलबर्न येथील हा इंडियन फिल्म फेस्टिवल हा ऑस्ट्रेलियामधील अत्यंत मोठा सोहळा असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मेलबर्नमध्ये या फिल्म फेस्टिव्हल दरम्यान भारतीय कंटेंटचाच बोलबाला दिसून आला.

यंदाच्या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2K21 मध्ये, ‘बेस्ट वेब सीरिज’ श्रेणीत भारतीय कंटेन्ट मधून बहुचर्चित क्राइम ड्रामा ‘मिर्झापूर सीझन 2’ विजयी ठरला. तर यासह दाक्षिणात्य अभिनेता सूरीया सिवकुमार आणि बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन यांनी ‘सोरारई पोट्रु’ व ‘शेरनी’मधील आपल्या उत्कृष्ट अभिनय शैलीसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार पटकावला आहे.

याशिवाय दुसऱ्या सीझनच्या अव्वल यशानंतर, द फॅमिली मॅन या लोकप्रिय वेबसिरीजमधील ‘श्रीकांत तिवारी’ अर्थात मनोज बाजपेयीला ‘वेब सीरिजमध्ये केलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष)चा पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर ‘द फॅमिली मॅन’ या गुप्तहेर थ्रिलर वेबसीरिजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त, मल्याळम कौटुंबिक ड्रामा द ग्रेट किचनने ‘इक्वालीटी ऑफ सिनेमा’ (फीचर) या श्रेणीमध्ये विशेष स्थान पटकावत एक अनोखी ओळख मिळवली आहे. पाहुयात अमेझॉन प्राईम व्हिडिओने पटकावलेल्या पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे:-

• अमेझॉन ओरिजिनल सीरीज, मिर्जापुर सीजन 2 – ‘सर्वश्रेष्ठ वेब सीरीज’

• ‘सर्वश्रेष्ठ प्रदर्शन’ (पुरुष): सूरीया सिवकुमार – अमेझॉन ओरिजिनल चित्रपट ‘सोरारई पोट्रु’ मधील भूमिकेसाठी

 

 

 

• ‘सर्वश्रेष्ठ फिल्म’ – अमेझॉन ओरिजिनल मूवी ‘सोरारई पोट्रु’

• ‘सर्वश्रेष्ठ प्रदर्शन’ (महिला): विद्या बालन – अमेझॉन ओरिजिनल चित्रपट शेरनी मधील भूमिकेसाठी

• ‘वेब सीरीज सर्वश्रेष्ठ प्रदर्शन’ (पुरुष): मनोज बाजपेयी – अमेझॉन ओरिजिनल सीरीज ‘द फॅमिली मॅन’मधील श्रीकांत तिवारी भूमिकेसाठी

• ‘वेब श्रृंखला सर्वश्रेष्ठ प्रदर्शन’ (महिला): समंथा अक्किनेनी – अमेझॉन ओरिजिनल सीरीज द फैमिली मैन’मधील राजी भूमिकेसाठी

• ‘इक्वालीटी ऑफ सिनेमा’ (फीचर): अमेझॉन प्राईम व्हिडीओ मल्याळम फॅमिली ड्रामा ‘द ग्रेट किचन’