हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर सध्या पाकिस्तानी कलाकारांविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. खोपकर नेहमीच मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटांना चित्रपटगृह, प्राईम टाइम मिळण्यापासून ते कलाकारांच्या वैयक्तिक अडचणींपर्यंत प्रत्येक विषयावर भाष्य करतात. इतकेच काय आवश्यकता असल्याचं आक्रमक देखील होतात. तर यावेळी अमेय खोपकर यांनी आपला मोर्चा बॉलीवुडकडे वळवला आहे. त्यांनी एक ट्विट करत निर्मात्यांना कडक इशारा दिला आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) November 16, 2022
अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांबाबत हे ट्वीट केलं आहे. त्यांनी बॉलिवूड सोबतच इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकार काम करताना दिसल्यास निर्मात्यांना परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. हे ट्विट करताना त्यांनी लिहिले आहे कि, ‘बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.’
सध्या अमेय खोपकरांच्या या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधले आहे. आता हा इशारा नेमका कुणाला देण्यात आला आहे ते तर स्पष्ट नाही. मात्र मनसे आता पाकिस्तानी कलाकारांना हिंदुस्थानात काम करू देत नाही हे नक्की. मनसेने याआधी देखील नेहमीच पाकिस्तानी कलाकारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने २०१९ साली चित्रपट उद्योगात काम करणार्या पाकिस्तानी कलाकारांवर संपूर्ण बंदी जाहीर केली होती. मात्र तरीही काही निर्माते त्यांना संधी देत आहेत. हे निदर्शनास आल्यामुळे मनसेने हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.
Discussion about this post