14 वर्षाची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला ; अमीर खानची मुलगी इरा खानचा धक्कादायक खुलासा
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.काही दिवसांपूर्वी तिने खुलासा केला होता की ती 4 वर्षांपासून नैराश्यात आहे. आता मात्र तिने अजून एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा इरा खानने केला आहे. इराने याबाबतचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात इराने आपल्यावर 14 वर्षाची असताना अत्याचार झाल्याचं म्हटलं आहे. इराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्यासोबत घडणार्या चांगल्या आणि वाईट घटनांचा उल्लेख करत आहे. इराने या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितले आहे.कोणत्या गोष्टी मुळे ती रडली किंवा लहानपणापासूनच कोणत्या गोष्टी मुळे ती मनाने मजबूत झाली. यासह व्हिडिओमध्ये इरा तिच्या पालकांच्या घटस्फोटाविषयीही बोलली आहे. या सर्वा व्यतिरिक्त इराने स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
इराने व्हिडिओमध्ये सांगितले की 14 वर्षांची असताना तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. तेव्हा तिला कळले नाही की ती व्यक्ती काय करीत आहे. हे सर्व काय होते, त्या माणसाचा हेतू काय होता हे समजण्यास एक वर्ष लागला. यानंतर मी माझ्या पालकांना याबद्दल सांगितले आणि नंतर गोष्टी हळूहळू सावरल्या. तथापि, नंतर माझा मलाच राग यायचा की मी हे कसे होऊ दिले , परंतु नंतर जे घडायच होत ते झालं होतं.
इरा म्हणाली, मी लहान होते तेव्हा माझ्या आईवडीलांनी घटस्फोट घेतला. परंतु त्यांच्या घटस्फोटाचा माझ्यावर परिणाम झाला नाही. कारण माझे पालक परस्पर संमतीने विभक्त झाले होते. ते आजही चांगले मित्र आहेत. माझ्या आई-वडीलांचा घटस्फोट, मी 14 वर्षांची असताना माझ्यावर झालेले लैंगिक अत्याचार या घटनांचा नकळत परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी मित्रांसोबत बाहेर जाणं टाळायचे. मी दिवसांतील बराचसा वेळ केवळ झोपून काढायचे. गर्दीत असूनही मी स्वत:ला एकटी समजू लागले. शेवटी एक वेळी आली जेव्हा मी ड्रिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव मला झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’